SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'डीलिमिटेशन होणं गरजेचं, कारण...'; महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसला घरचा आहेर

माझं मत आहे डीलिमिटेशन व्हायला पाहिजे, अशी भूमिका सुशीलकुमार शिंदे यांनी घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 28, 2026, 13:13 IST | Updated: Nov 28, 2026, 13:17 IST
Image Credit: Sushilkumar Shinde gives support to delimitation bill says its necessary
Join

केंद्र सरकारने संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात सादर केल्या जाणाऱ्या डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकावरून देशभरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. देशभरातील अनेक प्रादेशिक पक्षांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला आहे. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षदेखील विधेयकाला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येतंय. शरद पवारांच्या या निर्णयावरुन काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. डिलिमिटेशन विधेयकाला काँग्रेस विरोध करत असतानाच काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मात्र विधेयकाला पाठिंबा दिला आहे.

डिलिमिटेशन विधेयकावरुन सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्यात मतभेद असल्याचं पाहायला मिळतंय. सुशीलकुमार शिंदे यांनी विधेयकाला पाठिंबा दिला आहे तर प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. माझं मत आहे डीलिमिटेशन व्हायला पाहिजे, असं मत सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. तर,  राष्ट्रवादी शरद पवार गट देशाशी आणि संविधानाशी गद्दारी करत आहे, असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसने विरोध केला आहे. पण माझं मत आहे डीलिमिटेशन व्हायला पाहिजे. वेळ खूप निघून गेलेला आहे. लोकसंख्या जशी वाढते तसे प्रतिनिधी मिळायला पाहिजेत. त्यामुळे डिलीमिटेशन होणं जरुरीच आहे. आमच्या पक्षाची ती भूमिका आहे की 2011 च्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही खडीसुमारी करून त्याप्रमाणे करावं. परंतु आता काळ पुढे गेलेला आहे डीलिमिटेशन सर्व संमतीने झाल असता तर फार बरं झालं असतं, असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गट देशाशी आणि संविधानाशी गद्दारी करत आहे. देशाच्या आणि संविधानाच्या विरोधात जाऊन राष्ट्रवादी शरद पवार गट डिलिमिटेशन पाठींबा देत आहे, असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, द्रमुकचे 22 खासदार विधेयकाच्या बाजूने मतदान करणार असून चेन्नईत झालेल्या बैठकीत पाठिंब्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा. तर बसपाचाही विधेयकाला समर्थन देण्याचा निर्णय झाला आहे. यामुळं डिलिमिटेशन विधेयकाचा लोकसभेतील मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे.

डिलिमिटेशनवरुन इंडिआ आघाडीत फूट

डिलिमिटेनविरोधात रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत इंडिया आघाडीची तातडीची बैठक सुरु आहे. मात्र आघाडीतील अनेक घटक पक्षांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी शरद पवारांच्या खासदारांची बैठकीला दांडी तर निमंत्रण देऊनही आप आणि बिजू जनता दलाची पाठ यामुळं इंडिया आघाडीला घरघर लागल्याची चर्चा. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES