• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /तेजस ठाकरे यांनी नव्या गोगलगायीचा शोध लावला; सूक्ष्म गोगलगायीच्या नव्या प्रजाती

तेजस ठाकरे यांनी नव्या गोगलगायीचा शोध लावला; सूक्ष्म गोगलगायीच्या नव्या प्रजाती

तेजस ठाकरे यांच्याकडून नव्या गोगलगायीचा शोध लावला आहे. ठाकरे फाउंडेशनच्या वतीने पश्चिम घाटातील समृद्ध जैवविविधतेवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 25, 2026, 11:36 PM IST|Updated: Oct 25, 2026, 11:39 PM IST
joinshare
तेजस ठाकरे यांनी नव्या गोगलगायीचा शोध लावला;  सूक्ष्म गोगलगायीच्या नव्या प्रजाती

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

तेजस ठाकरे : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी नव्या गोगलगायीचा शोध लावला आहे. कोल्हापूरच्या तिलारी नगर परिसरात सूक्ष्म गोगलगायीच्या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. डिकॅरॅक्स तिलारिएन्सिस असं या नव्या प्रजातीचे शास्त्रीय नाव आहे. तिला तिलारी मायक्रो-स्नेल म्हणूनही ओळखले जाते. समुद्रसपाटीपासून जवळपास 730 ते 740 मीटर उंचीवर या प्रजातीचा शोध लागला आहे.

तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमने महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी नगर परिसरात सूक्ष्म गोगलगायीच्या नव्या प्रजातीचा शोध लावला.  ‘डिकॅरॅक्स तिलारिएन्सिस’ (Dicharax tilariensis) असे या नव्या प्रजातीचे शास्त्रीय नाव असून, तिला ‘तिलारी मायक्रो-स्नेल’ म्हणूनही ओळखले जाते. ही प्रजाती तिलारी नगर येथील अर्ध-सदाहरित जंगलांमध्ये आढळते.  उत्तर सह्याद्रीच्या पश्चिम घाट परिसरातून नोंदवण्यात आलेली Dicharax या वंशातील ही दुसरी प्रजाती आहे.   त्यामुळे ठाकरे फाउंडेशनच्या वतीने पश्चिम घाटातील समृद्ध जैवविविधतेवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. 

तिलारी संवर्धन राखीव क्षेत्राच्या नावावरून या प्रजातीला नाव देण्यात आले आहे.  समुद्रसपाटीपासून सुमारे 730 ते 740 मीटर उंचीवर या प्रजातीचा शोध लागला. या नव्या प्रजातीविषयीचे संशोधन ‘जर्नल ऑफ कॉन्कॉलॉजी’ (Journal of Conchology) या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे.

यापूर्वी तेजस ठाकरे यांनी पश्चिम घाटात खेकड्याच्या पाच प्रजाती शोधून काढल्या. घाटीयाना कुळातील दोन आणि सह्याद्रींना कुळातील तीन अशा एकूण पाच खेकड्यांच्या प्रजाती पश्चिम घाटातील गोड्या पाण्यात आढळल्या. तेजस ठाकरे आणि त्यांच्या सहकारी संशोधकांनी शोधलेल्या या प्रजातींची माहिती फ्रान्सच्या 'नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री'ने प्रकाशित केलेल्या 'झूसिस्टेमा' या संशोधन पत्रिकेत देण्यात आलीय. या शोधामुळे 8 प्रजातींची संख्या आता 13 झाली.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Uddhav Thackeray
Aaditya Thackeray