SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

...तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीविरोधात कायदेशीर कारवाई करु! ठाकरेंच्या शिवसेनेचा थेट इशारा; म्हणाले, 'राज्यपातळीवर मोठा...'

ठाकरेंच्या शिवसेनेनं स्वत:चा मित्र पक्ष असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला असा टोकाचा इशारा का दिला आहे? नेमकं या दोन पक्षांमध्ये असं झालंय काय? यासंदर्भात कोणी आणि काय म्हटलंय? जाणून घ्या ए टू झेड माहिती...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 16, 2026, 08:23 AM IST | Updated: Oct 16, 2026, 08:53 AM IST
Image Credit: ठाकरेंच्या शिवसेनेचा थेट इशारा (प्रातिनिधिक फोटो)
Join

दिल्लीमध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या सरकारविरोधी आंदोलनामध्ये विरोधी पक्षांची एकता दिसून येत नसल्याची टीका होत आहे. लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील या मोर्चाकडे विरोधीपक्षातील अनेक खासदार, आणदारांनी पाठ फिरवल्याची टीका होताना दिसतेय. मात्र दुसरीकडे आमचं सारं काही ठीक सुरु असल्याचा दावा केला जातोय. एकीकडे हा गोंधळ सुरु असतानाच दुसरीकडे स्थानिक पातळीवर मात्र विरोधकांमधील एकजूट कमी पडत असल्याचं ताजं उदाहरण सांगलीमधून समोर आलं आहे. या ठिकाणी पदवीधर मतदारसंघातील प्रचारादरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला थेट इशारा दिल्याचं दिसून आलं आहे. नेमका हा वाद काय आहे? कोणी काय म्हटलंय ते जाणून घेऊयात...

शरद पवारांचा पक्ष देखील फोटो चोरणारा पक्ष

शिवसेना ठाकरे गटाकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षालापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा फोटो वापरण्याच्या मुद्यावरुन इशारा दिला आहे.  उद्धव ठाकरेंचा फोटो वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला देण्यात आला आहे. तसेच जयंत पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष देखील फोटो चोरणारा पक्ष आहे, अशी घणाघाती टीकाही करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी ही टीका केली आहे.

महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये वाद पेटणार?

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवाराकडून प्रचार पत्रिकेवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो वापरण्यात आल्याचं आरोप विनायक राऊतांनी हा आरोप केला आहे. सांगलीमध्ये पार पडलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघातील उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार सुनील मोदी यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. दरम्यान, राऊत यांच्या आरोपामुळे महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये पुणे पदवीधर निवडणुकीत फोटोवरून वाद पेटणार आहे.

या वादाचं नेमकं कारण काय? कोणी कुठे छापलाय फोटो?

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांच्या प्रचार पत्रका/बॅनरवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो वापरण्यात आले आहेत. त्याचबरोबर शिवसेना (UBT) चे मशाल चिन्ह वापरल्याचा आरोपही आहे. याच मतदारसंघातून शिवसेना (UBT) चा उमेदवार सुनील मोदी लढत आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचा आक्षेप आहे की, स्वतःचा उमेदवार असताना इतर पक्षाच्या प्रचार साहित्यात ठाकरेंचे फोटो वापरून मत मागणे म्हणजे मतदारांची फसवणूक आणि मतचोरी आहे. यावरुनच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी स्पष्ट इशारा देताना, ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्हाचा वापर तातडीने थांबवा, असं म्हटलं आहे. राज्यपातळीवर मोठा पक्ष असूनही अशा पद्धतीने मते मागणे योग्य नाही, असंही विनायक राऊत म्हणालेत. असं केलं नाही तर अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही राऊत म्हणालेत. त्याचबरोबर मतदारांची जाहीर माफी मागा असंही विनायक राऊत म्हणालेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES