• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /ठाणे
  • /मुंबई-गोवा महामार्गावर सलग सहाव्या दिवशी वाहतूक कोंडी! कोकणातून परतणाऱ्या पर्यटकांचे हाल

मुंबई-गोवा महामार्गावर सलग सहाव्या दिवशी वाहतूक कोंडी! कोकणातून परतणाऱ्या पर्यटकांचे हाल

दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर मुंबई-गोवा महामार्गावर माणगावमध्ये वाहतूक कोंडी झाली आहे. कोकणातून मुंबईकडे परतणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांचा प्रवास संथ झाला आहे.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 15, 2026, 03:39 PM IST|Updated: Nov 15, 2026, 03:48 PM IST
joinshare
मुंबई-गोवा महामार्गावर सलग सहाव्या दिवशी वाहतूक कोंडी! कोकणातून परतणाऱ्या पर्यटकांचे हाल
Image Credit: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी कोकणात गेलेल्या पर्यटकांचा आता मुंबईकडे परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मात्र, परतीच्या प्रवासात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव शहरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. कोकणाकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांची गर्दी वाढल्याने वाहतुकीचा वेग मंदावलाय. सलग सहाव्या दिवशी महामार्गावर कोंडी झाल्याने प्रवाशांचा मनस्ताप वाढला आहे.

दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे महामार्गावर वाहनांचा भार

यंदा दिवाळीच्या सुट्ट्यांना शनिवार-रविवारची जोड मिळाल्याने अनेक कुटुंबांनी पर्यटनाचे नियोजन केले. मुंबई आणि उपनगरांमधील नागरिकांनी कोकणाला मोठ्या प्रमाणात पसंती दिली. त्यामुळे खासगी कार, एसटी बस आणि अन्य वाहनांची संख्या वाढली. सुट्ट्यांचा कालावधी संपत आल्याने आता हेच पर्यटक मुंबईकडे परतत आहेत. एकाच वेळी मोठ्या संख्येने वाहने महामार्गावर उतरल्यामुळे माणगावसारख्या महत्त्वाच्या टप्प्यावर वाहतुकीचा ताण निर्माण झाला आहे.

माणगाव बायपासचे अपूर्ण काम कोंडीचे महत्त्वाचे कारण

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न नवीन नाही. माणगाव आणि इंदापूर बायपासची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. महाराष्ट्र टाइम्सच्या 9 नोव्हेंबरच्या वृत्तानुसार, माणगाव बायपासच्या कामात भराव, डेक स्लॅब, क्रॅश बॅरियर आणि जोडरस्त्यांसारखी कामे प्रलंबित होती. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या वाहनांवर ताण कायम आहे.  

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरही 5 ते 6 किलोमीटरच्या रांगा

केवळ मुंबई-गोवा महामार्गच नव्हे, तर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरही दिवाळीच्या गर्दीचा परिणाम दिसून आला. एक्स्प्रेसवेवर वाहनांच्या रांगा 5 ते 6 किलोमीटरपर्यंत पोहोचल्या होत्या. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरही वाहनांची वर्दळ वाढली होती. त्यामुळे कोकण आणि पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना अपेक्षेपेक्षा अधिक वेळ प्रवासात घालवावा लागला.

प्रवासाला निघण्यापूर्वी वाहतुकीची स्थिती तपासा

दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर कामावर परतणाऱ्या चाकरमान्यांसाठी महामार्गावरील कोंडी मोठी अडचण ठरत आहे. माणगाव परिसरात वाहतुकीचा वेग कमी असल्याने प्रवासासाठी अतिरिक्त वेळ राखून ठेवणे आवश्यक आहे. वाहनचालकांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी वाहतूक पोलिसांचे अधिकृत अपडेट तपासावेत. गर्दीत घाईने वाहन चालवणे, चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करणे किंवा लेन बदलणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. महामार्गावरील अपूर्ण कामे पूर्ण होऊन बायपास सुरू झाल्यानंतरच या भागातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होऊ शकते, असे सांगितले जात आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai
Pune