SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

20 दिवस एकच स्वप्न पडत होतं; एका स्वप्नामुळे सापडला डोंबिवलीच्या खाडीत फेकलेला मृतदेह; पोलिसांनाही विश्वास बसेना

डोंबिवलीच्या खाडीत फेकलेला मृतदेह 20 दिवसानंतर सापडला आहे. एका स्वप्नामुळे या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 03, 2026, 04:41 PM IST | Updated: Nov 03, 2026, 04:47 PM IST
Join

डोंबिवली क्राईम : डोंबिलीच्या खाडीत एका व्यक्तीचा मृतदहे आढळून आला होता. यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र, हा मृतदेह कुणाचा आहे याची ओळख स्वप्नामुले पटली आहे. मृत्ययूनंतर मृत मित्र 20 दिवस स्वप्नात येत होता. यामुळे संबधीत तरुणाने थेट पोलिस ठाणे गाठले आणइ पोलिसांना याची माहिती दिली. यामुळे हे संपूर्ण हत्या प्रकरण उघडकीस आले आहे.  

मित्रानेच केली मित्राची हत्या

डोंबिवलीत उघडकीस आलेल्या हत्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहेय तपासादरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. यामुळे पोलिस देखील चक्रावून गेले आहे. दारूच्या पार्टीत झालेल्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

प्रभू करकडे असे आरोपीचे नाव आहे.  प्रभू करकडे  याने विशाल कदम याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात विशालचा मृत्यू झाला. यानंतर प्रभने घरमालक संदेश मात्रे याच्या मदतीने विशालचा मृतदेह गोणीत भरून निर्जनस्थळी फेकला. मात्र हत्येनंतर तब्बल 20 दिवस मृत विशाल स्वप्नात येत होता.  

आरोपीला पश्चात्ताप झाला आणि त्याने स्वतः ठाणे क्राईम ब्रँचच्या सेंट्रल युनिटमध्ये हजर होत हत्येची कबुली दिली. या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी हत्या करणारा प्रभू करकडे आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत करणारा घरमालक संदेश मात्रे या दोघांना अटक करत पुढील तपास सुरू केला आहे. 

पतीनेच केली पत्नीची गळा आवळून हत्या

जळगाव जिल्ह्यातील यावल येथे पतीनेच पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावल शहरातील आयशा नगर परिसरात ही घटना घडली. फरदीन खान (वय 21) असे आरोपी पतीचे नाव असून मशिराबी फरदीन खान असे मृत पत्नीचे नाव आहे. पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून फरदीन खान याने पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. हत्येनंतर आरोपी पतीने घरातून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवला. दरम्यान, पत्नीची हत्या करून पसार झालेल्या फरदीन खानला यावल पोलिसांनी साकळी गावाजवळून ताब्यात घेतले आहे. लग्नाला अवघे एक वर्ष झाले असतानाच घडलेल्या या घटनेमुळे यावल खळबळ उडाली असून याप्रकरणी फरदीन खान विरुद्ध यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES