ठाणे पोलिसांना अंमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट उघड केले आहे. मुंब्र्यात अंमली पदार्थाचे हे रॅकेट सुरु होते. पोलिसांनी चार परदेशी नागरिकांना अटक करत 1.50 कोटींचे MD ड्रग्ज जप्त केले आहेत. हे सर्व परदेशी नागरिक नाव बदलून राहत होते. यातील तिघे टांझानियाचे आणि एक नायझेरीाचा नागरिक आहे. हिंदी मराठी शिकून मुंब्र्यातून अंमली पदार्थांची तस्करी ते करत होते. तब्बल 1 कोटी 50 लाख 27 हजार 500 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. यामध्ये एक किलोपेक्षा जास्त एम डी अमली पदार्थ आहेत. यामधून मोठी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ठाणे पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार अमली पदार्थांची विक्री आणि सेवन करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू असताना मुंब्रा पोलिसांना परिसरात नायजेरियन नागरिक अमली पदार्थांच्या व्यवहारात सहभागी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपास करून संबंधित ठिकाणी कारवाई केली.
या कारवाईत चारही आरोपी तांझानिया देशाचे नागरिक असल्याचे समोर आले आहे. आरोपींकडून 1 कोटी 50 लाखांचे मेफेड्रोन (MD), तसेच मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, प्रकरणाचा पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.
शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा