SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

अजित पवारांच्या घातपातामध्ये सुनील तटकरेंचा हात? चौकशी व्हावी, सत्तेतील नेत्याचीच मागणी; 'त्याला स्वतःला उपमुख्यमंत्री व्हायचे होते'

अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ एका भीषण विमान अपघातात निधन झाले. या अपघाताबद्दल आता सत्ताधारी नेत्यानेच शंका उपस्थित केली असून थेट सुनील तटकरेंचं नाव घेतलं आहे.

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 09, 2026, 14:10 IST | Updated: Nov 09, 2026, 14:35 IST
Image Credit: थेट नाव घेत करण्यात आलं गंभीर विधान (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य सोशल मीडियावरुन साभार)
Join

जानेवारी महिन्यामध्ये विमान अपघातात निधन झालेले उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताचा 'घातपात' असा उल्लेख करत यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरेंचा हात आहे का असा संशय निर्माण होत असल्याचं कदम यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांच्या घातपातामध्ये सुनील तटकरेंचा हात असल्याचा संशय

रामदास कदमांनी पत्रकारांशी संवाद साधताना, "अजितदादांच्या घातपातामध्ये याचा हात आहे का असाही संशय निर्माण होतो. त्या अँगलने याची चौकशी झाली पाहिजे. हा फार महत्वकांशी आहे हा काहीही करू शकतो," असं सुनील तटकरेंवर गंभीर आरोप करताना म्हटलं आहे. सुनील तटकरे यांचे मेव्हणे अजय बिरवटकर यांचा जाहीर कार्यक्रमात मंचावर रामदास कदम यांनी अपमान केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावरुन राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच रामदास कदमांनी सुनील तटकरेंवर निशाणा साधलाय. 

योगेश कदमांविरोधात काम केलं

"सुनील तटकरे हा कोणाचा होऊ शकत नाही. तो अंतुले साहेबांचा पीए होता. त्याने त्यांना देखील संपवलं. त्याच्या निवडणुकीत मी खांद्याला खांदा लावून काम केलं. लोक मला म्हणाले हा कोणाचा होणार नाही. हा बेईमान माणूस आहे. भविष्यात याची मदत होणार नाही. विधानसभेच्या निवडणुकीत योगेश कदम यांच्या विरोधात त्यांनी काम केलं," असा गंभीर आरोप रामदास कदमांनी केली. 

तुझ्या मेव्हण्याची माझ्याजवळ बसण्याची औकात आहे का?

"राष्ट्रवादी-भाजप-शिवसेना युती असताना त्याने गुहागर मतदारसंघात भास्करला (भास्कर जाधव यांना) मदत केली. उबाठाला मदत केली," असंही रामदास कदम म्हणाले. तसेच, मेव्हण्याच्या अपमानावरुन बोलताना, "तुझ्या मेव्हण्याला सांगतो, तुझी माझ्याजवळ बसण्याची औकात तरी आहे का?" असं रामदास कदम म्हणाले. 

70 हजार कोटींचे आरोप होते

"अजितदादा आणि तुमच्यावर कोकणातील 16 धरणांचे आरोप होते, 70 हजार कोटींचे... त्यातील हे पोयनाळ धरण होते. अनेक वर्षे हे काम बंद पडले हे तुझे पाप होते. 14 गावचे लोक पाण्यापासून वंचित राहिले हे तुझे पाप आहे," असं रामदास कदम म्हणाले. एवढ्यावरच न थांबताना, "भाजपला पाठिंबा दिला तेव्हा हे आरोप मागे घेतले गेले. जनता है, सब जानती है. त्याला स्वतःला उपमुख्यमंत्री व्हायचे होते," असंही रामदास कदम म्हणाले. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES