SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

कोकणातून ₹10 हजार कोटींच्या कमाईचा राज्य सरकारचा प्लॅन; ना पर्यटन, ना मासेमारी मग कशातून उभारणार एवढा पैसा?

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सरकारच्या डोक्यात नेमका काय विचार आहे नक्की हा एवढा पैसा कसा मिळवला जाणार आङे याबद्दलची माहिती देताना काय म्हटलंय जाणून घ्या...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 30, 2026, 01:41 PM IST | Updated: Oct 30, 2026, 01:59 PM IST
Image Credit: पत्रकारांशी संवाद साधताना दिली माहिती (प्रातिनिधिक फोटो)
Join

महाराष्ट्र सरकारने आपल्या तिजोरीमधील महसूल वाढवण्यासाठी आता थेट समुद्रकिनाऱ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या प्लॅनिंगअंतर्गत कोकणातून 10 हजार कोटी रुपये मिळवण्याचा सरकारचा मानस असला तरी त्यासाठी मासेमारी किंवा पर्यटनाची मदत घेतली जाणार नाहीये. तर महाराष्ट्र सरकारने चार नवीन बंदरे विकसित करण्याचं ठरवलं असून यामधूनच ही कमाई केली जाणार आहे. यासंदर्भातील माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली. मंत्रालयामध्ये पत्रकारांशी बोलताना राणेंनी सरकार कशाप्रकारे 10 हजार कोटींचा महसूल मिळवण्याचा विचार करत आहे आणि त्यासाठी काय काय केलं जाणार आहे याची माहिती दिली. या योजनांअंतर्गत कोकणातल्या चार ठिकाणी नवी बंदरं उभारली जाणार आहे.

6 ते 10 हजार कोटी रुपयांचा महसूल

महाराष्ट्राच्या तिजोरीला बळ देण्यासाठी आणि सागरी अर्थव्यवस्थेला अधिक चालना देण्याच्या उद्देशाने बंदरांमधून मिळणारा महसूल वाढण्याचा सरकारचा मानस आहे. सध्या राज्यात 48 बंदरे असली तरी त्यामधून सरकारला दरवर्षी केवळ 258 कोटी रुपयेच मिळतात. महाराष्ट्राला मोठा समुद्रकिनारा लाभला असून आता राज्य सरकार स्वत:च्या मालकीची चार बंदरे विकसित करणार आहेत. यासाठी पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. या जिल्ह्यांमध्ये नवी बंदरं उभारली जाणार आहेत. यामधून 6 ते 10 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा सरकारला असल्याचं राणेंनी म्हटलं आहे. 'विकसित महाराष्ट्र 2047' या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड या बंदरांचा आराखडा आणि पायाभूत सुविधा तयार करत असल्याचंही राणे म्हणाले.

प्रवासी जलवाहतूक सुरू करण्याची योजना

तसेच, रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथे गोवा शिपयार्डच्या माध्यमातून जहाजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचाही सरकारचा प्रयत्न असल्याचं राणेंनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र सागरी मंडळासाठी नवे धोरण आणण्याबरोबरच मंडळाच्या स्वतःच्या बोटींतून प्रवासी जलवाहतूक सुरू करण्याची योजनाही आखण्यात येत असल्याची माहिती राणेंनी दिली.  सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाजवळील कोर्लई येथून, तसेच मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा दरम्यान नवीन जलवाहतूक सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे.

उद्योगांना चालना अन् रोजगार

राज्यातील बंदरांबद्दलची माहिती देताना राणेंनी, "राज्यात सध्या 48 बंदरे आहेत. मात्र, या बंदरांमधून सरकारला वर्षाला केवळ 258 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. या पार्श्वभूमीवर 100 टक्के सरकारी मालकी असलेली बंदरे विकसित करून महसुलाचे नवे स्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे," असं सांगितलं. तसेच, "नव्या बंदरांमुळे मालवाहतूक, सागरी उद्योग, सेवा क्षेत्र आणि पूरक उद्योगांना - चालना मिळू शकते. तसेच, किनारपट्टी भागात रोजगारनिर्मितीला वाव मिळेल', असा विश्वास राणेंनी व्यक्त केला.

सविस्तर माहिती दिलीच नाही

मात्र राणे यांनी या प्रकल्पासंदर्भातील सविस्तर माहिती दिली नाही. या बंदरांची उभारणी नेमकी कधी सुरू होणार? त्यासाठी किती गुंतवणूक अपेक्षित आहे? कोणत्या कालावधीत सहा ते 10 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळेल? याची माहिती राणेंनी दिली नाही.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES