• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /ठाणे
  • /डोंबिवलीत विवाहितेसोबत धक्कादायक प्रकार; 70 व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

डोंबिवलीत विवाहितेसोबत धक्कादायक प्रकार; 70 व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

डोंबिवलीत विवाहितेला ब्लॅकमेल करण्यात आले. 70 हून अधिक व्हिडिओ काढून तिला संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकण्यात आला.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 08, 2026, 12:04 AM IST|Updated: Oct 08, 2026, 12:08 AM IST
joinshare
डोंबिवलीत विवाहितेसोबत धक्कादायक प्रकार; 70 व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

 डोंबिवली क्राईम : डोंबिवलीत मैत्रीचा फायदा घेत विवाहितेशी प्रेमसंबंध निर्माण केल्यानंतर तिचे तब्बल 70 हून अधिक व्हिडिओ काढल्याचा आरोप आहे. विवाहितेने संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. एवढंच नाही तर आरोपीने विवाहितेच्या पतीला तिचे फोटो पाठवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कुणाल शिंगाडे याला अटक केली आहे

डोंबिवलीतील शिरढोण परिसरात राहणाऱ्या कुणाल शिंगाडे याची संबंधित विवाहितेशी मैत्री होती. या मैत्रीचा फायदा घेत आरोपीने तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले आणि तिचे 70 हून अधिक व्हिडिओ काढल्याचा आरोप आहे. 

काही काळानंतर विवाहितेने संबंध ठेवण्यास नकार दिल्याने आरोपीने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर आरोपीने महिलेच्या पतीला तिचे फोटो पाठवल्याचाही आरोप आहे. या प्रकाराला कंटाळून महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत कुणाल शिंगाडे याला अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहेत.

नाशिकमध्ये सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेचा मृत्यू

नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे...या घटनेत सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनं विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे... दीपाली पवार असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव असून आरोपी पतीसह सासू-सास-याला अटक करण्यात आलीये...सासरच्या मंडळींकडून तिला मानसिक त्रास  दिपालीच्या नोकरीतून मिळणाऱ्या पगाराच्या पैशांवरूनही तिच्यावर दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप तिच्या वडिलांनी फिर्यादीत केला आहे..चारित्र्यावर पतीकडून संशय घेतला जात असल्याचा दावा दिपालीच्या कुटुंबियांनी केलाय..  सततचा संशय, कौटुंबिक दबाव आणि मानसिक त्रासामुळे दिपाली तणावाखाली असल्याचं तिच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे...

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
crime
Maharashtra News