SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मोठी बातमी! शिवसेना नेत्या मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, प्रदीप पूर्णेकर प्रकरण भोवलं, पत्रात म्हणाल्या ‘माझ्यामुळे...’

ठाण्यातील विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं असताना शिवसेना नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 29, 2026, 03:43 PM IST | Updated: Oct 29, 2026, 03:56 PM IST
Image Credit: शिवसेना नेत्या मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा
Join

ठाण्यातील विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून आरोपांच्या केंद्रस्थानी असणाऱ्या शिवसेना नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. प्रदीप पूर्णेकर प्रकरणात त्यांचाही सहभाग असल्याचा आरोप होता. त्यांची कथित ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. याप्रकरणी त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांची 8 वेळा, तर मीनाक्षी शिंदेंची 2 वेळा चौकशी कऱण्यात आली आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि पूर्णेकर कुटुंब आक्रमक झाले असताना अखेर त्यांनी पद सोडलं आहे. 

मीनाक्षी शिंदे यांनी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा सोपवला असून त्यात लिहिलं आहे की, "मी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा आपणाकडे सुपूर्द करीत आहे. हा निर्णय नाराजीतून नव्हे, तर आपल्या नेतृत्वाचा सन्मान आणि पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी घेतला आहे".

राजीनामा पत्रात काय लिहिलं आहे वाचा -

गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर तसेच पक्षांतर्गत माझ्याबाबत सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप व सर्वबाबींचा एकत्रित वेध घेऊन माझ्यावर विविध आरोप करता पक्ष नेतृत्वाचा अर्थात मुख्य नेते व पक्षांतर्गत म्हणून आपणास वेढीस धरण्याचे जे षड्यंत्र चालू आहे ते पाहून माझ्या मनाला प्रचंड वेदना होत आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.

मी आजवर संपूर्ण निष्ठेने पक्षाचे काम केले. पक्षाला किंवा आपणांस कधीही मान खाली घालावी लागेल, असे कोणतेही कृत्य केले नाही. तरीही, ज्या प्रकरणांशी माझा काहीही संबंध नाही, त्यामध्ये माझे नाव जोडून आपल्यावर आणि पक्षावर दबाव निर्माण केला जात आहे, हे पाहून मन व्यथित होते अशा भावना त्यांनी मांडल्या  आहेत.

ज्या नेतृत्वाचा सन्मान जपण्यासाठी मी आजवर काम केले, त्याच नेतृत्वाच्या बदनामीचे कारण माझ्यामुळे व्हावे, हे कल्पनाही मला सहन होत नाही. माझी निष्ठा आणि माझ्या कार्याची पावती आरोपांच्या माध्यमातून दिली जात असल्याची भावना मनाला बोचत आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

म्हणूनच, मी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा आपणाकडे सुपूर्द करीत आहे. हा निर्णय नाराजीतून नव्हे, तर आपल्या नेतृत्वाचा सन्मान आणि पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी घेतला आहे. माझ्या भावनांची बाजू आपण समजून घ्याल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

संजय राऊतांनी केलीये अटकेची मागणी

खासदार संजय राऊत यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पूर्णेकर यांच्या मुलाने काही पुरावे समोर आणल्याचा दावा राऊत यांनी केला. हत्येपूर्वी आरोपींसोबत राजेंद्र शिंदे दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला. राऊत यांनी ठाणे पोलिसांवर राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला आहे. एसआयटीच्या तपासावरही त्यांनी टीका केली आहे. तर मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा पलटवार नरेश म्हस्केंनी केला आहे. 


 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES