• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /ठाणे
  • /मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूककोंडीचा फटका, 25 वर्षांच्या तरुणीचा मृत्यू

मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूककोंडीचा फटका, 25 वर्षांच्या तरुणीचा मृत्यू

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 20 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी वर्सोवा ब्रिज ते वसईपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Written ByMansi Kshirsagar
Published: Oct 28, 2026, 02:57 PM IST|Updated: Oct 28, 2026, 03:05 PM IST
joinshare
मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूककोंडीचा फटका, 25 वर्षांच्या तरुणीचा मृत्यू
Image Credit: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूककोंडी

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
शिवसेनेत फूट का पडली? शिंदेंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून ठाकरेंचे वकिल हसले; असं म्हणाले तरी काय?

शिवसेनेत फूट का पडली? शिंदेंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून ठाकरेंचे वकिल हसले; असं म्हणाले तरी काय?

2

अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीने उधळला गुलाल! किरण सरनाईक यांचा सलग दुसऱ्यांदा विजय

3

केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी! महागाई भत्त्यात वाढ, मोदी सरकारने मंजूर केले 10016 कोटी

4

दिवाळीचा पहिला सण वसुबारस; काय आहे परंपरा, तिथी, पूजा विधी आणि मुहूर्त जाणून घ्या

5

20 लाखांची कचोरी! भारतभर चर्चेत असलेला Viral Video पाहिला का? गाडीवरुन पाठलाग करण्याऐवजी...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण वाहतूक कोंडीचा फटका बसला असून या कोंडीत झालेल्या अपघातात 25 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विरारहून मुंबईच्या दिशेने जात असताना दुचाकीवरील तरुणी मोठ्या कंटेनरखाली आल्याने तिचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

बुधवारी सकाळपासूनच वर्सोवा ब्रिजपासून विरार हद्दीपर्यंत सुमारे 20 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना तासन् तास कोंडीत अडकून पडावे लागले होते. ठाण्यात पूर्णेकर समर्थकांनी मंगळवार दुपारीपासूनच आंदोलन पुकारले होते. त्याचा परिणाम मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झाला.

ठाण्यातील रास्ता रोको आंदोलनामुळे ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक वळवण्यात आल्याची माहिती आहे. परिणामी, महामार्गावरील वाहतुकीचे नियोजन विस्कळीत होऊन कोंडीत भर पडली. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, सध्या महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.

सहा तास ठाणे घोडबंदर मार्ग ठप्प केला

पूर्णेकर समर्थकांनी काल रात्री तब्बल सहा तास ठाणे घोडबंदर मार्ग ठप्प केला होता. मीनाक्षी शिंदे व राजेंद्र शिंदे यांना तात्काळ अटक करा अन्यथा हटणार नाही अशी भूमिका समर्थकांनी घेतली होती. पोलिसांनी समर्थकांची समजूत काढली मात्र कोणताही मार्ग न निघाल्याने परिसरातील विद्युत रोषणाई बंद करत पोलिसांनी थेट समर्थकांवर लाठीचार्ज केला यानंतर समर्थकांनी देखील पोलिसांवर दगडफेक केली यादरम्यान काही काळ तणावाचे वातावरण  संपूर्ण मानपाडा परिसरात निर्माण झाले होते.

आता तब्बल सहा तासानंतर वाहतूक जरी सुरळीत असली तरी देखील संपूर्ण मानपाडा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी  घोडबंदर मार्गावरील मानपाडा प्रदीप पुर्णेकर यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर तैनात केली असून परिसरातील दुकानेही अद्याप बंद दिसून येत आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Thane
Mumbai News