मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे पीडित तरुणीच्या मैत्रिणीनेच तिला नराधमांच्या स्वाधीन केल्याचं समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
काशीगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या 17 वर्षांच्या अल्पवीयन मुलीला भेटण्याच्या बहाण्याने बोलवून तिच्याच 25 वर्षीय मैत्रिणीने जबरदस्तीने मद्य पाजले. त्यानंतर तीन तरुणांच्या ताब्यात दिले. त्यानंतर दोन तरुणांनी पहाटेपर्यंत पीडितेवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
धक्कादायक म्हणजे, पीडिता बेशुद्ध पडल्यानंतर गैरफायदा घेत तिच्या गळ्यातील सोन्याची 50 हजारांची चेनही आरोपींनी लंपास केली. या धक्कादायक घटनेनंतर पीडितेने काशीगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार 19 नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
16 नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास 25 वर्षीय मैत्रिणीने 17 वर्षांच्या मैत्रिणीला भेटण्याच्या बहाण्याने बोलवले. रात्री नऊ ते बाराच्या दरम्यान ती मैत्रिण व तीन तरुणांनी मिळून पीडितेला विनयनगर परिसरातील उच्चभ्रू इमारतीतील फ्लॅटमध्ये नेले. तिथे तिला जबरदस्तीने मद्य पाजले. त्यानंतर दोन तरुणांनी पहाटे सहा वाजेपर्यंत पीडितेवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. अत्याचारानंतर पीडिता बेशुद्धावस्थेत होती. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केली आहे.
शहापूर तालुक्यातून एक संतापजनक आणि निंदनीय घटना समोर आली आहे. आसनगाव परिसरात 6 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या तरुणाने अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार, शेजारी राहणाऱ्या 30 वर्षीय तरुणाने मुलीला खाऊ देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केला आणि ही गोष्ट कोणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.