लग्नाचे वचन देऊन शारिरीक संबंध...; नंतर तेच व्हिडिओ विकायचा, नालासोपाऱ्यातील हादरवणारे प्रकरण, आरोपीच्या फोनमध्ये 80 तसले व्हिडिओ
नालासोपारा अत्याचार प्रकरणी आणखी एक तरुणीची तक्रार. रात्री पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर नालासोपारा पोलिसांनी आरोपी आरिफ शेख विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नालासोपारा अत्याचार प्रकरणाची व्याप्ती वाढू लागलीये. या प्रकरणातील आरोपी आरिफ याच्यावर चौथा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
आरोपीनं पीडित तरुणीला राजोडी येथील समुद्र किना-यावरील एका लॉजमध्ये नेलं आणि अत्याचार केल्याचा आरोप पीडित तरुणीनं केलाय. या प्रकरणी आता नालासोपारा पोलिसांकडूनन अर्नाळा पोलिसांकडे गुन्हा वर्ग करण्यात आलाय.
समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी आरिफवर अनेक तरुणींना फसवल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याचे अश्लील व्हिडिओ बनवून पॉर्न साइटवर विकण्यात आल्याचा धक्कादायक आरोपही करण्यात येत आहे. या तरुणाच्या मोबाईलमध्ये 80 हून अधिक अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. आत्तापर्यंत आरिफविरोधात 4 मुलींनी आवाज उठवला असून तक्रार दाखल करणाऱ्या तरुणीने आरोप केला आहे की, त्याने साधारण 70 ते 80 मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवले असून त्यांचे अश्लील व्हिडिओ पॉर्नोग्राफिक साइटवर विकले आहेत.
आरोपीची ओळख आरिफ शेख म्हणून समोर आली आहे. आरिफवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलिसांनी आरिफला अटक केली असून त्याची आई रुखसाना आणि चुलत भाऊ साहिल शेख यांच्या नावांचाही समावेश असल्याचा समोर आले आहे.
तक्रारीनुसार, तरुणीची आरिफसोबत मागील वर्षी सोशल मीडियावर ओळख झाली. तिने तक्रारीत पुढे म्हटलंय की, आरिफने लग्नाचे वचन दिले. त्यानंतर त्याच्यासोबतच राहण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होता. त्याने कथितरित्या तिच्यावर बळजबरी शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. इतकंच नव्हे तर, धर्म बदलण्यासाठी आरिफ आणि त्याच्या आईने तरुणीवर दबाव टाकला, मारहाण केली. तसंच, आरिफच्या भावानेही तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, असं तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे की, तिला आरिफच्या फोनमध्ये अनेक मुलींसोबत त्याचे अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. त्यानंतर तिने मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्कं साधत नालासोपारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरिफ हिंदु मुलींना टार्गेट करुन त्यांच्यावर अत्याचार करायचा, असं तरुणीने म्हटलं आहे. तिने आरोप केला आहे की, त्याने कमीत कमी 701 ते 80 मुलींना फसवले असून त्यांचे व्हिडिओ पोर्नोग्राफिक वेबसाइटवर अपलोड केले आहेत.
पोलिसांकडून आता त्याच्या मोबाईल फोनमधून कथितरित्या सापडलेल्या व्हिडिओची तपासणी करत असून त्याने आणखी किती मुलींना जाळ्यात ओढलं याची चौकशी करत आहे.
इतकंच नव्हे तर, 9 ऑक्टोबर रोजी छेडानगर येथील जिममध्ये हिंदू धर्म, नवरात्रोत्सव आणि हिंदू महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आरोपीवर आहे. त्यानंतर मोबाईलची तपासणी केली असता महिलांचे आक्षेपार्ह व्हिडीओ आढळल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. तसेच व्हॉट्सॲपवरून आंतरराष्ट्रीय क्रमांकावर असे व्हिडीओ पाठवल्याचे तपासात समोर आल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी धार्मिक भावना दुखावणे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून लैंगिक स्वरूपाचा मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे