SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'दोन झापडीचे नाहीत हे, यांची औकात...', शिंदे सेनेच्या, '...तर ठाण्यातून परत जाणार नाही' आव्हानाला राऊतांचं सडेतोड उत्तर; ‘बाजूला पोलीस आहेत म्हणून...’

ठाण्यामधील पूर्णेकरांच्या हत्येला आज एक महिना पूर्ण झाला असून या वादावरुन दोन्ही शिवसेना आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याच वादात नरेश म्हस्केंनी विरोधकांना थेट आव्हान दिलेलं असतानाच त्याला राऊतांनी उत्तर दिलंय.

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 29, 2026, 11:32 AM IST | Updated: Oct 29, 2026, 11:51 AM IST
Image Credit: शिंदे सेनेच्या आव्हानाला उत्तर (प्रातिनिधिक फोटो)
Join

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येला आज एक महिना पूर्ण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आज ठाण्यामध्ये सर्वपक्षीय आंदोलनाची हाक देण्यात आली असून आमदार आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. मात्र या आंदोलनाच्या पूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी थेट इशारा देताना, जर तुम्ही ठाण्यात येऊन वाटेल तशा पद्धतीची वक्तव्य करणार असाल तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही, असं म्हटलं आहे. याच इशाऱ्यावर आदित्य ठाकरेंसोबत आजच्या आंदोलनात सहभागी होणारे खासदार संजय राऊत यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे. राऊत यांनी पूर्णेकर प्रकरणावरुन थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करतानाच म्हस्केंनाही टोला लगावला आहे.

गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे

म्हस्केंच्या आव्हानावर राऊत यांनी उत्तर दिलं आहे. "ठाणे किसी की बाप की जागीर नही," असं राऊत यांनी म्हटलं आहे. "ठाणे हे कोणाच्या बापाची जहागीरी नाही. विषय हत्येचा असेल तर पूर्णकरांच्या हत्येची सुपारी कोणी दिली? हा प्रश्न विचारणं म्हणजे तुमच्या नेत्याची बदनामी आहे का?" असा सवाल राऊत यांनी केला. तसेच, "तुम्हाला का टोचत आहे? पूर्णकरांच्या हत्येची सुपारी कोणी दिली? ज्याने बाप आणि जीने पती गमावला ती पत्नी व मुलगा मृताच्या न्यायासाठी तडफडत असेल त्याच्यामागे आम्ही उभे राहणार आहोत. ते आमचं कर्तव्य आहे. आम्ही जाणार आहोत (ठाण्यात!) काय करणार आहात तुम्ही? अशा जर धमक्या सत्ताधारी पक्षाचे लोक देत असतील याचा अर्थ राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे," असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

आम्ही कोणाविषयी अपशब्द काढला नाही

"ठाणे पोलीस आयुक्त तात्काळ बदलले पाहिजेत. विरोधी पक्ष नेते आमदार, खासदार तुम्ही जर 'बघून घेऊ', 'अरे बघून घेऊ', ही भाषा शिवसेनेची आहे डुबलीकेट लोकांची नाही. 'अरे कसले ठोसे ठोसा असायला आधी मनगट असायला पाहिजे. मनगट असेल तर ठोसा आहे. स्वाभिमानी माणसाकडे मनगट असतं हे स्वाभिमानी माणसाचा मनगट पळकुट्या किंवा गद्दारांकडे असतं का? आम्ही कोणाविषयी अपशब्द काढला नाही," अशी आठवण राऊतांनी करुन दिली.

बाण आरपार घुसला...

"पूर्णकर कुटुंबियांना न्याय द्या! पूर्णकर चिरंजीव याने जे पुरावे समोर दिले की हत्यापूर्वी काही काळ माजी महापौर हे आपण शिंदे आहेत आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे आहे त्यांच्याबरोबर काय करत होती? हे त्या खून्यांना मार्गदर्शन करत होते. कशा गोळ्या चालवायच्या आणि कुठे चालवायच्या एवढे पुरावे असताना जर ठाणे पोलीस आयुक्त आणि जी काही एसआयटी नेमली आहे ते मुख्य आरोग्याला अटक करत नसेल तर नक्की त्यांच्यावर दबाव आहे. दबाव कोणाचा असू शकतो दबाव? ट्रम्पचा तर असणार नाही किंवा पुतीनचा असणार नाही. नेफ्रॉन  असणार नाही किंवा सर्वात जे नवीन सरकार जिंकलं आहे त्यांचा असणार नाही. गणेश नाईक यांचा असणार नाही. देवेंद्र फडणवीस यांचा असणार नाही, मग दबाव कोणाचा असणार? मग ज्यांचा दबाव आहे त्यांच्या बाण आरपार घुसला आहे," असा टोला राऊत यांनी नाव न घेता लगावला आहे.

सत्ता आहे म्हणून लोक रस्त्यावर...

ठाण्यातील संघर्षासंदर्भात प्रश्न विचारला असता राऊत यांनी, "प्रश्न तयारीचा नाही. संघर्ष आम्ही करायला जात नाही. जर सत्ताधारी पक्षाला गुंडगिरीवर उतरायचं असेल तर ती जबाबदारी राज्याच्या गृहमंत्र्यांची आहे आणि ठाणे पोलीस आयुक्त आणि पालकमंत्री यांची आहे. आम्ही जे म्हणत आहे महाराष्ट्रामध्ये गुंडांचा राज्य आहे आणि ठाण्याची अवस्था बीडपेक्षा वाईट आहे हे जे सांगितलं जात आहे त्याचा हा पुरावा आहे. दोन झापडीचे नाहीत ते. बाजूला पोलीस आहेत म्हणून यांची जीभ चुरचुर चालते का? यांची औकात आहे का? सत्ता आहे म्हणून लोक रस्त्यावर धरून मारतील पळवून लावतील सत्ता नसेल तर?" असा सवाल केला.

हल्लेखोरांच्या समर्थनार्थ तुम्ही आम्हाला

"एक खून केला आहे. या लोकांनी एका तरुण कार्यकर्त्याचा खून केला आहे आणि तुम्ही त्या खूनाचं समर्थन करत आहात? एका तरुण कार्यकर्त्याचा खून होतो ठाण्यामध्ये आणि त्या खूनाच्या हल्लेखोरांच्या समर्थनार्थ तुम्ही आम्हाला धमकी देत आहात. अशा खूप धमक्या पाहिल्या आहेत म्हणून मी आज इथे उभा आहे. असे धमकीवाले आले आणि गेले," असं राऊत म्हणाले.

अटक व्हायला हवी होती

"राम पूर्णकर यांनी दिलेले पुराव्यांच्या आधारे दोघांनाही तात्काळ अटक व्हायला पाहिजे. व्हिडिओ आणि पुरावे पाहता ताबडतोब अटक झाली पाहिजे असे भारतीय न्याय सविधान कलम 307 सांगतं," असं राऊत यांनी आमदार प्रताप सरनाईक यांनी मीनाक्षी शिंदेंवर आरोप होत असल्याच्या दाव्याला उत्तर देताना म्हटलं.

आज ठाण्यात आंदोलन

पूर्णेकरांच्या कुटुंबियांना न्याय मिळून द्या या मागणीसाठी आज सायंकाळी पाच वाजता ठाण्याच्या जांभळी नाका येथे सर्वपक्षीय 'भयमुक्त ठाणे' ना मथळ्याखाली आंदोलन केलं जाणार आहे. या आंदोलनाला आदित्य ठाकरे स्वत: उपस्थित राहणार आहेत. प्रदीप पूर्णेकरांना न्याय द्यावा, सूत्रधार असलेल्या शिंदे दांपत्यावर कारवाई करावी तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी हे आंदोलन केलं जाणार आहे. आदित्य ठाकरेंसोबत खासदार संजय राऊत देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES