गुप्तांगाच्या भागात 3 जखमा, अंतर्वस्त्र काढले अन्..., ठाणे पोलिसांवर आरोप करणाऱ्या तरुणाचा धक्कादायक VIDEO समोर
कापूरबावडी पोलिसांवर आरोप करणाऱ्या तरुणाचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे.
ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दररोज नवीन नवीन ट्विस्ट येत आहेत. गुरुवारी ठाण्यातील कापूरबावडी पूर्णेकर समर्थक असलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी पकडून थर्ड डिग्री दिल्याचा आरोप करण्यात आला. राम पूर्णेकर हे शुक्रवारी दोन तरुणांसोबत कापूरबावडी पोलीस स्टेशनला पोहोचले आणि त्यांनीकापूरबावडी पोलिसांनावर गंभीर आणि खळबळजनक आरोप केलेत.
टॉर्चर आणि लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करणाऱ्या तरुणाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय. या तरुणाच्या हातात दगड आणि विटा असल्याचं दिसत आहे. संबंधित हा तरुण पूर्णेकर समर्थक असल्याचा आणि त्यानं दगडफेक केल्याचा आरोप आहे. दगडफेक केल्याच्या आरोपाखाली हा तरुण पोलिसांच्या ताब्यात होता. या तरुणानं पोलिसांवर टॉर्चर आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर हा व्हिडीओ आता समोर आलाय. व्हिडिओत असे 2 तरुण दिसत आहेत. ज्यांच्या हातात दगड आणि विटा दिसत आहे.
हेसुद्धा वाचा - गुप्तांगाच्या भागात 3 जखमा अन्...; ठाणे पोलिसांवर गंभीर आरोप करणाऱ्या तरुणाच्या मेडिकल रिपोर्टमधून काय आलं समोर?
या धक्कादायक व्हिडीओमुळे या प्रकरणाला नवीन वळण आलंय. या व्हिडीओमुळे पूर्णेकर समर्थकांकडून दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्हिडीओमधील हे दोन तरुण तेच आहेत ज्यांनी कापूरबावडी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे प्रसारमाध्यामासमोर पोलिसांवर आरोप करणाऱ्या तरुणांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थितीत होतोय.
हेसुद्धा वाचा - अंतर्वस्त्र काढायला लावली अन्..., सूर्यफूल तेल लावून लघवीच्या जागेवर...; पूर्णेकर समर्थकांवर ठाणे पोलिसांकडून अत्याचार झाल्याचा आरोप, तरुण म्हणाला...
पण दुसरीकडे या तरुणांच्या मेडिकल अहवालातून त्यांच्यासोबत लैंगिक अत्याचार आणि नाजूक जागी जखमा दिसून आल्यामुळे नेमकं त्या कशामुळे झाल्यात हादेखील एक प्रश्न उपस्थितीत होतोय. आता हे प्रकरण कोणत्या दिशेला जातं हे पाहावं लागणार आहे.