प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात SIT ला मोठं यश! मारेकरी टल्ली याच्याकडून कर्नाळा परिसराजवळ...
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात SIT ला मोठं यश मिळालं आहे. मारेकरी टल्ली याच्याकडून कर्नाळा परिसराजवळ महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत.
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या तपासात विशेष तपास पथकाला (SIT) मोठं यश मिळालं आहे. ठाणे एसआयटी पथकाने मुख्य आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली याच्याकडून कर्नाळा परिसराजवळील एका अज्ञात ठिकाणावरून हत्येत वापरलेले एक पिस्तूल आणि दोन धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. सध्या घटनास्थळी पोलिसांकडून जप्तीचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांची ठाण्यातील त्यांच्या ऑफिसमध्ये हत्या करण्यात आली. या घटनेला 22 दिवस उलटून गेल्यानंतर आता SIT ला मोठं यश प्राप्त झालं आहे. संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि अन्य पाचही आरोपींला गजाआड केलं आहे. आता पुढील तपास करताना संतोष कनोजिया उर्फ टल्ली याने महत्त्वाची आणि मोठ्या पुराव्याचा खुलासा केला. पोलिसांनी यापूर्वी या हत्याकांडात एक पिस्तूल आणि एक मोबाईल जप्त केला होता. कर्नाळा अभयारण्याजवळ महामार्गालगत एका पडक्या झोपडीच्या पाठीमागे झुडपात पिस्तूल, मोबाइल पोलिसांना सापडले आहेत. याच भागात आता पोलिसांना एक पिस्तूल आणि दोन धारदार शस्त्रे जप्त केली आहे. चौकशीदरम्यान प्रदीप पूर्णेकर हत्याकांडात वापरण्यात आलेल्या शस्त्राबद्दल टल्ली याच्याकडून माहिती मिळाली आहे. या माहितीनुसार रायगड जिल्ह्यातील कर्नाळा परिसराजवळील एका अज्ञात ठिकाणावरून हत्येत वापरलेले एक पिस्तूल आणि दोन धारदार शस्त्रे जप्त केली आहेत.
हेसुद्धा वाचा - राम पूर्णेकरांने दाखवलेल्या बंदूकवाला त्या व्हिडीओवर राजेंद्र शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, पोलिसांच्या चौकशीनंतर...
ठाण्यातील गणेशनगर कार्यालयात 29 सप्टेंबर रोजी रात्री प्रदीप पूर्णेकरांची हत्या झाली होती. मारेकऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. तसंच धारदार शस्त्राने वार केले होते. या हल्ल्यात प्रदीप पूर्णेकरांचा मृत्यू झाला. विशेष तपास पथकाने सुभाष शिंदे उर्फ पप्या, निखिल यादव उर्फ शूटर, नितेश पवार उर्फ भावड्या आणि संतोष कनोजिया उर्फ टल्लीला अटक केली आहे. 2021 मध्ये उत्तर प्रदेशातून खरेदी करण्यात आलेली पिस्तुले पूर्णेकर यांच्या हत्येसाठी कशी वापरली, कशी पोहोचली, त्यांचा वापर कोणी आणि कशा प्रकारे केला, याचा तपास पोलीस या मारेकऱ्यांच्या चौकशीतून शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.