SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा! हत्येचा तपास मुळशीच्या दिशेने? शस्त्रांची खरेदी...अन् राजेंद्र शिंदेंच्या अडचणीत वाढ

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. शस्त्रांच्या खरेदीचा तपशील समोर आला असून त्या दोन व्हिडीओनंतर पोलिसांचा तपास पुणे जिल्ह्यातील मुळशीच्या दिशेने सरकला आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 24, 2026, 10:07 AM IST | Updated: Oct 24, 2026, 10:10 AM IST
Image Credit: Pradeep purnekar murder
Join

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे ठाण्याचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येचा तपास जसाजसा पुढे जातोय, धक्कादायक खुलासे होत आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्णेकर यांच्यावर गोळीबार करण्यासाठी वापरलेली दोन्ही देशी पिस्तुले ही उत्तर प्रदेशातून खरेदी केली गेली होती. तर हल्ल्यासाठी वापरलेले चॉपर मुंबईतील चोरबाजारातून खरेदी करण्यात आलं होतं, असा खुलासा झाला आहे.

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा!

या तीन चॉपरची एकूण किंमत 200 ते 250 रुपये असल्याची माहिती आरोपींनी तपासादरम्यान समोर आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, ही शस्त्र खरेदीसाठी पैसा कोठून आणि कोणी उपलब्ध करून दिला, हे देखील लवकरच तपासात समोर येणार आहे. दरम्यान पोलिसांनी सांगितलं की, अद्याप एक चॉपर जप्त करणे बाकी आहे.

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा तपास मुळशीच्या दिशेने?

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात समोर आलेल्या 'त्या' दोन व्हिडीओनंतर पोलिसांचा तपास पुणे जिल्ह्यातील मुळशीच्या दिशेने सरकण्याची चिन्हे आहेत. संबधित व्हिडीओ जुने असल्याचे सांगितले जात असले तरी पोलीस पथक मुळशीमध्ये जाऊन चौकशी करण्याची शक्यता आहे.

राजेंद्र शिंदेंच्या अडचणीत वाढ?

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात शुक्रवारी सातव्यांदा राजेंद्र शिंदे यांची पोलिसांनी दिवसभर चौकशी केली. सकाळी सुरू झालेली चौकशी संध्याकाळी त्यांना सोडण्यात आलं. माजी नगरसेविका मीनाश्री शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्याशी संबंधित दोन व्हिडीओ राम प्रदीप पूर्णेकरांनी समोर आणल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यातील एका व्हिडीओमध्ये आरोपी निखिल यादव हा बंदूक चालवत आहे. तर, त्याच्या बाजूला राजेंद्र शिंदे उभे असल्याचे दिसून येते. हा व्हिडीओ मुळशी येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष तपास पथकाच्या हाती संबंधित व्हिडीओ लागले अनुषंगाने पोलिसांकडून मुळशीमध्ये चौकशी केली जाण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, संतोष कनोजिया आणि अमित सिंग या दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत आज शनिवारी संपत आहे. त्यामुळे या दोघांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES