SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

प्रदीप पूर्णेकर प्रकरणात पती राजेंद्र शिंदेंनंतर मीनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; 'निवडणुकीच्या काळात छोटे-मोठे वाद...' चौकशीत काय विचारलं?

राम पूर्णेकर यांच्या नेतृ्त्वात पूर्णेकर कुटुबीयांकडून ठाण्याच आंदोलन सुरु असताना दुसरीकडे माजी महापौर मीनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी करण्यात आली.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 28, 2026, 09:14 AM IST | Updated: Oct 28, 2026, 09:16 AM IST
Image Credit: minakshi Shinde
Join

ठाण्यातील शिवसेना ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर मानपाडा परिसरातील वातावरण तापले आहे. मंगळवारी राम पूर्णेकरांच्या नेतृत्त्वात रास्तारोको आंदोलन केल्यामुळे तणावपूर्ण वातावरण होतं. तरदुसरीकडे या प्रकरणाची चौकशी एटीएस करत असून पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे. राम पूर्णेकर आणि कुटुंबाकडून वारंवार प्रदीप पूर्णेकर हत्येमागे माजी महापौर मीनक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे आहे, असा आरोप केला आहे. त्यानंतर एटीएसकडून अनेक वेळा तासंतास राजेंद्र शिंदे यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी (27 ऑक्टोबर) ला मीनाश्री शिंदे यांची सलग सात तास चौकशी करण्यात आली आहे.

चौकशीनंतर मीनाक्षी शिंदे काय म्हणाल्यात?

मीनाक्षी शिंदे यांची सात तास चौकशी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्यात की, माझी पहिल्या दिवसापासून जी भूमिका आहे, तीच आजही आहे. त्यात कुठलाही बदल झालेला नाही. आम्ही चौकशीत सहकार्य करू या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. पोलिसांनी जेव्हा बोलवतील तेव्हा चौकशीसाठी मी हजर राहणार आहे. तसंच मला पुन्हा चौकशीला बोलावलं पण कधी ते माहिती नाही. ज्या दिवशी बोलवतील त्या दिवशी मी नक्की येईन.

मीनाक्षी शिंदेंना चौकशीदरम्यान काय काय विचारलं?

मीनाक्षी शिंदेंची चौकशी पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या एसआयटीने घेतली. या चौकशीत पूर्णेकर यांच्याशी नेमका कशामुळे वाद होता? आरोपींना पहिलेपासून ओळखतात का? पती राजेंद्र यांचे प्रदीप यांच्याशी कोणते वैर होते? अशा प्रकारची प्रश्न त्यांना विचारण्यात आली.


प्रश्न - तुमचं पूर्ण नाव काय?

उत्तर - मीनाक्षी राजेंद्र शिंदे

प्रश्न -  प्रदीप पूर्णेकरांना ओळखता का?

उत्तर -हो, प्रदीप पूर्णेकर माझ्याच प्रभागात राहायचे.

प्रश्न - निवडणुकीच्या काळात तुम्ही प्रदीप पूर्णेकर यांना धमकी दिली होती का? तो कॉल रेकॉर्डिंगमधील आवाज तुमचा आहे?

उत्तर - हो, मी त्याबाबत पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला होता. ती ऑडिओ क्लिप AIच्या मदतीने बनवण्यात आली होती, असा माझा दावा आहे.

प्रश्न - निवडणुकीत प्रदीप पूर्णेकर यांनी तुमच्या विरोधात काम केल्याचा राग मनात ठेवून तुम्ही हत्या केली असा पूर्णेकर कुटुंबांचा आरोप आहे?

उत्तर - निवडणुकीच्या काळात छोटे-मोठे वाद होतच असतात. ते वाद त्याच वेळी विसरून आम्ही पुढे जात असतो. मी इतकी वर्षे राजकारणात असून माझ्या विरोधात अनेकांनी काम केलंय, मग म्हणून मी सर्वांना विरोध करणार का? पूर्णेकर कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी असून जे झाले ते चुकीचे झालं. मात्र, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. राजकारण म्हणून नाहक माझं नाव या प्रकरणात गोवण्यात येतंय.

प्रश्न - प्रदीप पूर्णेकरांचा एक व्हिडीओ आहे, ज्यात त्यांच्या जीवाचे काही बरे-वाईट झाल्यास त्याला मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे जबाबदार असतील असं म्हटलंय?

उत्तर -  जर ते माझ्याबद्दल असे जाहीरपणे बोलत होते, तर आम्ही त्यांना का मारू? असे केल्यास संशय आमच्यावरच येणार, हे अगदी स्पष्ट आहे. त्यामुळे मी किंवा माझ्या कोणत्याही व्यक्तीने ही हत्या केलेली नाही. राजकारण करून मला बदनाम करण्यात येत आहे.

प्रश्न - संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली याला तुम्ही ओळखता का?

उत्तर - हो, तो माझा कार्यकर्ता आहे.

प्रश्न - प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येतील मुख्य हल्लेखोर संतोष कनोजिया असल्याचे समोर आलं आहे?

उत्तर - हो, मलाही ही बातमी प्रसारमाध्यमांमधूनच समजली आहे. तो माझा कार्यकर्ता असून याचा अर्थ मी त्याला हत्या करण्यास सांगितलं, असा होत नाही. तसं पुरावे आहेत का? त्याने जे केले, त्यासाठी पोलिसांनी त्याला अटक केलीय. तपासातून खरे-खोटे समोर येणार आहे.

प्रश्न - राजेंद्र शिंदे यांच्यावरही प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा आरोप होतोय?

उत्तर - त्यांची आठ वेळा चौकशी आपणच केलीय. आपल्याला लक्षात आलंच असणार की कोणी काय केले आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES