SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मीनाक्षी - राजेंद्र शिंदेंची चौकशी, सीसीटीव्ही फुटेज...; अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणाले, 'पुराव्याची सांगड घालून...' प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

ठाण्यातील शिवसेना ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येसंदर्भात ठाणे अतिरिक्त पोलीस आयुक्त, तपास अधिकारी आणि SIT प्रमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठी अपडेट दिली.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 28, 2026, 03:02 PM IST | Updated: Oct 28, 2026, 03:21 PM IST
Image Credit: Pradeep Purnekar Thane police
Join

ठाण्यातील शिवसेना ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या तपासासंदर्भात ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले पत्रकार परिषद घेतली. प्रदीप पूर्णेकर हत्येला जबाबदार असलेल्यांना कठोर कारवाई करण्यात यावी. तर माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अटक करण्यात यावी म्हणून राम पूर्णेकरांसह पूर्णेकर कुटुंबियासह कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नौपाडा पोलीस स्टेशनबाहेर मंगळवारी राम पूर्णेकरांसह कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. या प्रकरणामुळे ठाण्यातील वातावरण तापले आहेत. अशातच ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांनी इशारा दिला आहे की, कायदा हातात घेऊन तपासात अडथळा निर्माण करु नका. जर कायदा हाता घेतला तर कारवाई करण्यात येईल. तसंच माझं ठाणेकरांना विनंती आहे की, लोकांना वेठीस धरता कामा नये, किंवा लोकांच्या भावना दुखवल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी.

ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांनी काय काय सांगितलं?

पत्रकार परिषदेत ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले म्हणाले की, आम्हाला 164 चे स्टेटमेंट रेकॉर्ड करायचं आहे. ते जर लवकर झाले तर आपल्या पुरावे कमी बळकटी मिळेल. असा हा एकंदरीत सर्व हा गुन्हाचा तपास आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या बाबतीत सुद्धा प्रॉपर शहानिशा करून जे काही त्यामध्ये पुरावे आहेत त्याचे धागेदोरे त्याची जुळवाजुळून तपासाची दिशा निश्चित होणार आहे. 

हेसुद्धा वाचा - प्रदीप पूर्णेकर प्रकरणात पती राजेंद्र शिंदेंनंतर मीनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; 'निवडणुकीच्या काळात छोटे-मोठे वाद...' चौकशीत काय विचारलं?

ते पुढे म्हणाले की, प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणाच्या तपासादरम्यान साक्षीदारचे नोंद केलेली आहे. त्या ठिकाणी जे पुरावे उपलब्ध झाले त्या सर्व पुराव्याची प्रॉपर सांगड घालून त्या अनुषंगाने हा पुढचा तपास होणार आहे. कोण काय म्हणत यापेक्षा जे महत्त्वाचे पुरावे आहे आणि ते आपल्याला के कन्विक्शनपर्यंत घेऊ शकतील हा आमचा प्रथम प्रयत्न असेल. 

राजेंद्र शिंदेंच्या चौकशीबद्दल सांगताना ते म्हणाले की, राजेंद्र शिंदे यांना सुद्धा चौकशीला वारंवार बोलावलं आहे. त्यांची चौकशी तपास अधिकारी आणि तपास प्रमुख यांनी केली आहे. त्याचबरोबर मीनाक्षी शिंदे यांनाही चौकशीसाठी बोलावलं होतं. जे काही तपासामध्ये फॅक्ट निष्पन्न झाले त्या अनुषंगाने इंटरोगेशन चालू आहे. तसंच पुराव्याची जुळवाजुळ होईल त्याप्रमाणे कारवाई होईल.

 

ते पुढे म्हणाले की प्रदीप पूर्णेकर प्रकरणात पाच आरोपींना अटक केली. त्यांची चौकशी झाली त्यांच्याकडून जी काही आवश्यक माहिती मिळाली आणि बरीचशी माहिती मिळणे बाकी आहे, त्या अनुषंगाने पुढची कारवाई होईल. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES