SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मुंबईतून कोकण गाठा अवघ्या 1 तास 10 मिनिटांत, नितेश राणेंची मोठी घोषणा; मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होणार!

सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावरून 16 नोव्हेंबरपासून नवी मुंबईसाठी FLY91 ची रोज विमानसेवा सुरू होणार. उड्डाणाच्या वेळा, प्रवासाचा कालावधी आणि पर्यटनाला होणारा फायदा जाणून घ्या.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 14, 2026, 03:01 PM IST | Updated: Nov 14, 2026, 03:11 PM IST
Image Credit: कोकणात विमानसेवा
Join

कोकणवासीयांसाठी एक गुड न्यूज समोर आलीय. बस, रेल्वे आणि खासगी गाड्यांसोबत आता कोकणात जाण्यासाठी विमानाचा पर्यायही उपलब्ध झालाय. कोकणवासीय ज्याची आतुरतेने वाट पाहत होते ती विमानसेवा अखेर सुरु होतेय. याचं वेळापत्रकही जाहीर झालय. पालकमंत्री नितेश राणेंनी यासंदर्भात घोषणा केलीय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

कोकणवासियांसाठी गुड न्यूज

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्यातील थेट विमानसेवा 16 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होतंय. पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत माहिती दिली. ही सेवा आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध असेल. प्रादेशिक विमान कंपनी FLY91 या मार्गावर विमान चालवणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग आणि मुंबई महानगर प्रदेशादरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना रस्ते वाहतुकीबरोबरच हवाई प्रवासाचा पर्याय मिळणार आहे.

नवी मुंबईहून सकाळी उड्डाण

या मार्गावरील विमानांचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. नवी मुंबई ते सिंधुदुर्ग: विमान क्रमांक IC 6001, सकाळी 7.55 वाजता प्रस्थान, सकाळी 9.5 वाजता चिपी येथे आगमन.सिंधुदुर्ग ते नवी मुंबई: विमान क्रमांक IC 6002, सकाळी 9.25 वाजता प्रस्थान तर सकाळी 10.35 वाजता नवी मुंबईत आगमन होणार आहे. दोन्ही दिशांचा नियोजित प्रवास सुमारे 1 तास 10 मिनिटांचा आहे. सध्या या मार्गावर दररोज एक फेरी उपलब्ध असेल. त्यामुळे त्याच दिवशी मुंबईतून सिंधुदुर्गला जाऊन संध्याकाळी विमानाने परत येण्याची सुविधा या वेळापत्रकात नाही.

पर्यटन, व्यवसाय आणि स्थानिक रोजगाराला चालना

सिंधुदुर्ग जिल्हा समुद्रकिनारे, किल्ले, निसर्गरम्य पर्यटनस्थळे आणि कोकणी खाद्यसंस्कृतीसाठी ओळखला जातो. थेट विमानसेवा सुरू झाल्यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि परिसरातील पर्यटकांना जिल्ह्यात पोहोचणे अधिक सोयीचे होऊ शकते. हॉटेल व्यवसाय, स्थानिक वाहतूक, होमस्टे, पर्यटन मार्गदर्शक आणि स्थानिक खाद्यव्यवसायांना याचा फायदा होणार असल्याचे राणेंनी सांगितले. तसेच नोकरी, वैद्यकीय उपचार आणि व्यावसायिक कामांसाठी मुंबईत येणाऱ्या सिंधुदुर्गवासीयांनाही या सेवेचा उपयोग होणार असल्याचे नितेश राणे म्हणाले.

चिपी विमानतळासाठी महत्त्वाचे पाऊल

चिपी विमानतळाचे उद्घाटन 9 ऑक्टोबर 2021 रोजी झाले होते. सुरुवातीला मुंबई-सिंधुदुर्ग मार्गावर अलायन्स एअरची सेवा सुरू झाली होती. मात्र ही सेवा ऑक्टोबर 2024 मध्ये बंद झाली. त्यानंतर विमानतळावरून पुणे, बंगळुरू आणि हैदराबादसारख्या शहरांसाठी FLY91 सेवा चालवत आहे. आता नवी मुंबईशी थेट संपर्क सुरू झाल्यामुळे चिपी विमानतळाच्या नियमित वापराला चालना मिळण्याची शक्यता आहे.

विमानसेवेसाठी राज्य सरकारची आर्थिक मदत

या मार्गावरील विमानसेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने व्यवहार्यता तूट निधी (Viability Gap Funding - VGF) अंतर्गत आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे. 27 ऑक्टोबर 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या मार्गासाठी १०० टक्के VGF मंजूर करण्यात आले. प्रति आसन दोन्ही दिशांसाठी 6200 रुपयांची मदत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. प्रवाशांनी तिकीट बुक करण्यापूर्वी FLY91 च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध भाडे, सामानाची मर्यादा आणि रद्द करण्याचे नियम तपासावेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES