SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

‘काही दिवसांत सुनील तटकरे राष्ट्रवादीबाहेर’, शिवसेनेकडून खळबळजनक दावा; रायगडमध्ये तटकरे विरुद्ध गोगावले संघर्ष पेटला!

सुनील तटकरे काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसबाहेर पडतील, असा दावा आमदार महेंद्र दळवींनी केला. रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या नाराज कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश आणि नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापले.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 14, 2026, 07:30 PM IST | Updated: Nov 14, 2026, 07:40 PM IST
Image Credit: तटकरे कुटुंबाच्या बालेकिल्ल्याला शिवसेनेचे आव्हान
Join

रायगडच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्याबाबत मोठा दावा केलाय. आगामी काही दिवसांत तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाहेर असतील, असे दळवी म्हणाले. तटकरे यांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.


'अजित पवारांच्या निधनानंतर यांना उपरती'

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेने वेग घेतला आहे. याच मुद्द्यावरून दळवींनी तटकरेंना लक्ष्य केले. आधी विलीनीकरणाबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचे सांगणारे तटकरे आता अजितदादांनी आपल्याला याबाबत सांगितले होते, असे म्हणत असल्याचा आरोप दळवींनी केला. तटकरेंना या घडामोडींची आधीपासून माहिती होती, असा दावाही त्यांनी केला. 

‘रायगडचा खासदार शिवसेनेचाच’

जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. रायगडमध्ये यापुढे शिवसेना ठरवेल तोच खासदार होईल, असे विधान त्यांनी केले. महाडमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रवेश चालतो; मात्र श्रीवर्धनमध्ये शिवसेनेने प्रवेश केला की आक्षेप घेतला जातो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पक्षवाढीच्या प्रयत्नांवर टीका करणाऱ्यांना त्यांनी प्रत्युत्तर दिले. माणगावमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आणण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीच्या नाराज कार्यकर्त्यांचे शिवसेनेत प्रवेश

रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत असल्याची राजकीय चर्चा आहे. श्रीवर्धनचे राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष दर्शन विचारे यांनी पक्ष सोडून शिंदे गटाच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होतोय या घडामोडीमुळे तटकरे कुटुंबाचा प्रभाव असलेल्या श्रीवर्धनमधील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

तटकरे कुटुंबाच्या बालेकिल्ल्याला शिवसेनेचे आव्हान

माणगाव आणि श्रीवर्धनमधील पक्षप्रवेश कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने राष्ट्रवादीविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी रायगडचा खासदार शिवसेनेचा आणि श्रीवर्धनचा आमदार शिवसेनेचा करण्याचे आवाहन केले. त्यामुळे महायुतीत एकत्र असलेल्या दोन पक्षांमधील स्थानिक संघर्ष पुन्हा उघड झाला आहे. आगामी स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये या संघर्षाचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES