• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /ठाणे
  • /लवकरच भिवंडीत धावणार मेट्रो, आता मुंबईत येणे सोप्पे होणार; मेट्रो 5 प्रकल्पाबाबत मोठी अपडेट

लवकरच भिवंडीत धावणार मेट्रो, आता मुंबईत येणे सोप्पे होणार; मेट्रो 5 प्रकल्पाबाबत मोठी अपडेट

ठाणे-भिवंडी मार्गिकेवर महिनाअखेरीस मेट्रो गाडीच्या चाचण्यांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 23, 2026, 07:28 AM IST|Updated: Oct 23, 2026, 07:31 AM IST
joinshare
लवकरच भिवंडीत धावणार मेट्रो, आता मुंबईत येणे सोप्पे होणार; मेट्रो 5 प्रकल्पाबाबत मोठी अपडेट
Image Credit: thane bhiwandi metro 5

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

2

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

3

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

4

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

5

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

ठाणे-भिवंडीतील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येतेय. लवकरच ठाणे-भिवंडीत मेट्रो धावणार आहे. ठाणे-भिवंडी मार्गिकेवर महिनाअखेरीस मेट्रो गाडीच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे. ठाणे-भिवंडी मेट्रो 5 मार्गिकेच्या रुळांवर पहिली गाडी दाखल झाली आहे.

नवरात्रीच्या दिवशी ठाणे-भिवंडी मेट्रो 5 मार्गिकेवर ही गाडी आणण्यात आली.  लवकरच या गाडीच्या चाचण्यांना या महिन्याच्या अखेरीस सुरुवात होणार आहे. त्या पूर्ण होताच पुढील वर्षाच्या सुरुवातीला या मेट्रोवर गाडी धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मेट्रो 5 मार्गिका ही 11.9 किमी लांबीची असून त्यावर सहा स्थानके आहेत. सद्यस्थितीत या मार्गिकेवर यंत्रणेची आणि अंतिम फिनिशिंगची कामे सुरू आहेत.

पहिल्या टप्प्यात मेट्रो गाडीच्या सुरक्षिततेशी संबंधित चाचण्या केल्या जाणार आहेत. तसंच, या मेट्रोवरील चाचण्या आणि सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर अंतिम तपासणीसाठी सीएमआरएस पथकाला बोलवण्यात येणार आहे.

कशी असेल मार्गिका?

मेट्रो 5चा पहिला टप्पा ठाणे ते धामणकर नाका असा असेल. पहिल्या टप्प्यात 11.9 किमी अशी धावणार आहे. या मार्गिकेवर बाळकुम, कशेळीस, काल्हेर, पूर्णा, अंजूरफाटा, धामणकर नाका अशी 6 स्थानके असणार आहेत. तर या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 6,741 कोटी रुपये इतका आहे.

कारशेड पूर्ण होईपर्यंत पिटलाईनवरून सेवा सुरू करणार

कशेळी टोल नाक्याजवळ 27 हेक्टर जागेवर मेट्रो मार्गिकेच्या कारशेडचे काम सुरू आहे. कारशेड कशेळी टोल नाक्याजवळ सुमारे 27  हेक्टर जागेवर उभारले जात आहे. मेट्रो 5 मार्गिकेच्या तिन्ही टप्प्यातील सुमारे 32 किमी मार्गासाठी हे कारशेड उभारले जात आहे.

या कारशेडचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही वर्ष लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कारशेडचे काम पूर्ण होईपर्यंत मेट्रो मागिंकेचा पहिला टप्पा सुरू करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपातील पिट लाईन उभारण्यात आली आहेत.

कसा असेल प्रकल्प?

मेट्रो मार्ग-5 (ठाणे- भिवंडी- कल्याण ) या प्रकल्पाची एकूण लांबी 24.9  कि .मी आहे. या मार्गामध्ये 15 मेट्रो स्थानके आहेत. सध्या सुरू असलेल्या मेट्रो मार्ग -4 (वडाळा ते कासारवडवली) आणि प्रस्तावित मेट्रो मार्ग- 12 (कल्याण ते तळोजा) आणि मध्य रेल्वे यांच्यात परस्पर एकीकरण साधण्यात येईल. हा मेट्रो मार्ग सध्याच्या प्रवासाची वेळ 50 % ते 75 % पर्यंत कमी करेल

कोणती 15 स्थानके

1. बाळकुम नाका, 2. कशेळी, 3. काल्हेर, 4. पूर्णा, 5.अंजुरफाटा, 6. धामणकर नाका, 7. भिवंडी, 8. गोपाळ नगर, 9. टेमघर, 10. रजनोली, 11. गोव गाव, 12 कोन गाव, 13. लाल चौकी, 14. कल्याण स्टेशन, 15. कल्याण एपीएमसी.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai Metro
Mumbai News
Infrastructure news