• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /ठाणे
  • /देहविक्री रॅकेटमधून 2 अभिनेत्रींची सुटका! मीरा-भाईंदरमधील हॉटेलच्या छाप्यात काय सापडलं? गोवा कनेक्शनही समोर

देहविक्री रॅकेटमधून 2 अभिनेत्रींची सुटका! मीरा-भाईंदरमधील हॉटेलच्या छाप्यात काय सापडलं? गोवा कनेक्शनही समोर

मीरा-भाईंदरमधील हॉटेलच्या छाप्यात मोठ्या देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश करत दोन अभिनेत्रींची सुटका करण्यात आली आहे. तर एका महिला एजंटला पोलिसांनी अटक केली आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 29, 2026, 12:23 PM IST|Updated: Oct 29, 2026, 12:25 PM IST
joinshare
देहविक्री रॅकेटमधून 2 अभिनेत्रींची सुटका! मीरा-भाईंदरमधील हॉटेलच्या छाप्यात काय सापडलं? गोवा कनेक्शनही समोर
Image Credit: Thane Mira Bhayandar Crime

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'आमने-सामने'तून केतकी-रोहनची एक्झिट, आता नव्या जोडीची एन्ट्री, नवीन प्रयोगाची तारीखही सांगितली

'आमने-सामने'तून केतकी-रोहनची एक्झिट, आता नव्या जोडीची एन्ट्री, नवीन प्रयोगाची तारीखही सांगितली

2

सोलापूरची कन्या ठरली WPL 2027 ऑक्शनमधली सर्वात महागडी भारतीय खेळाडू, पाहा 5 महागड्या खेळाडूंची लिस्ट

3

निकाल लागताच महायुतीच ठिणगी! मित्रपक्षाने युतीचा धर्म पाळला नाही, प्रवीण दरेकरांचा आरोप, 'धंगेकरांना वरुन आदेश आले...'

4

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षनिवडीच्या काही तासाआधी मोठा ट्विस्ट, 350 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

5

कोण आहे उमा काश्वी? वैभव सूर्यवंशीपेक्षा कमी वयात मिळालं WPL मध्ये संधी, कहाणी वाचून तुम्हीही कौतुक कराल

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईदरमध्ये एका हॉटेलमध्ये देहविक्रीचा काळा धंदा सुरू असल्याची माहिती मिळतात, याठिकाणी छापा टाकण्यात आला. या देहविक्रीच्या दलदलीतून  दोन अभिनेत्रींची सुटका करण्यात आली आहे. तर पोलिसांनी एका महिला एजंटला ताब्यात घेतलं आहे.

ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईदर, वसई आणि विरार पोलीस आयुक्तालयाच्या नवघर पोलीस स्टेशन  पथकाला टीप मिळाली होती. 'द डी पिझ्झा हॉटेल' जवळील 'सिल्व्हर क्लाउड हॉटेल' मध्ये देहविक्रीचे रॅकेट सुरू आहे. इथे एक महिला एजंट मॉडेलिंग, फोटोशूट आणि बंगाली मालिकांसाठी ग्राहकांना वेश्याव्यवसायाकरिता मुली पुरवते. ती 'सिल्व्हर क्लाउड हॉटेल'च्या पहिल्या मजल्यावर, धर्मकांटा फाटक रोडवरील शिवराज चेंबरमध्ये येणार आहे.

या टीपनंतर 'सिल्व्हर क्लाउड हॉटेल' आणि 'द डी पिझ्झा हॉटेल'ला एक बनावट ग्राहक पाठवण्यात आला. त्यानंतर नवघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद यादव आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय धुमेसह पथकाने या ठिकाणी धाड टाकली. त्या ठिकाणाहून एका महिला एजंट अटक तर दोन पीडित तरूणींची सुटका करण्यात आली. तर एक महिला एजंट फरार आहे.

पोलिसांनी सांगितलं की, अटक केलेली महिला एजंट आणि फरार महिला एजंट या लोणावळा, गोवा, मुंबई, ठाणे आणि मीरा भाईंदर येथील ग्राहकांना फोटोशूट, मॉडेलिंग आणि बंगाली मालिकांमध्ये काम करणाऱ्या मुलींचे फोटो पाठवून त्यांना देहविक्रीच्या दलदलमध्ये खेचत होत्या.

दरम्यान आता फरार महिलेच्या शोधण्यासाठी नवघर पोलीस ठाण्याचे पथक सक्रीय झाले आहे. तर अटकेतील महिला एजंटकडून एक मोबाईल फोन, रोकड आणि सीलबंद कंडोमची पाकिटे पोलिसांनी जप्त केली आहेत.

या देहविक्री रॅकेटमधील अटक केलेल्या महिला एजंट आणि फरार महिला एजंटच्या साथीदारांचा, तसंच मॉडेलिंग, फोटो शूट आणि मालिकांमध्ये काम करणाऱ्या आणखी किती मुलींना वेश्याव्यवसायात ओढले गेले आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांनी माहिती दिली की, अटक करण्यात आलेल्या महिला एजंट आणि पीडित मुलींनी काम बंगाली मालिका आणि फोटोशूट केली आहे. यामध्ये


रूपोशी बांगला चॅनल - ही बरेली बंधू
ई टीव्ही - सांझ बाती
स्टार जलसा चॅनल - टॉक शो
बंगाली टीव्ही शो - हजार घंटा
दागिने डिझायनिंग - फोटोशूट
साडी आणि लेहेंगा - फोटोशूट

नवघर पोलीस स्टेशनचे पथक अटक करण्यात आलेल्या महिला एजंट आणि फरार महिला एजंटवर बीएनएस (BNS) आणि पीटा (PITA) कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई केली आहे. तर दोन्ही पीडित मुलींना महिला सुधारगृहात कोठडीत ठेवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करण्यात येत आहे.

नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली, एमबीव्हीव्ही पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ अधिकारी, झोन 1 चे डीसीपी राहुल चव्हाण (आयपीएस), एसीपी सोहेल शेख, नवघर पोलीस ठाण्याचे पीआय दत्तात्रय धुमे, एपीआय विश्वास बाबर आणि नवघर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे या देहविक्री व्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Thane
crime