Who Is Uma Kashvi? बुधवार 28 ऑक्टोबर रोजी महिला प्रीमियर लीगचा मिनी ऑक्शन पार पडला. या ऑक्शनमध्ये एकूण 150 खेळाडूंवर बोली लावण्यात आली. मात्र या सगळ्यात WPL ऑक्शनमधील सर्वात कमी वयाची खेळाडू ही प्रसिद्धीच्या झोतात आली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकचं प्रतिनिधित्व करणारी 15 वर्षांची उमा काश्वी हिला दिल्ली कॅपिटल्सने 10 लाख रुपयांना विकत घेतलं. उमाची कहाणी ही थोडीफार वैभव सूर्यवंशी सारखी असून तो आयपीएलमध्ये खेळणारा सर्वांत कमी वयाचा खेळाडू आहे.
कोण ठरलं महागडी खेळाडू?
महिला प्रीमियर लीगच्या पाचव्या सीजनसाठी मिनी ऑक्शन पार पडलं. बुधवारी कोची येथे झालेल्या ऑक्शनमध्ये ऑस्ट्रेलियाची सोफी मोलिनक्स ही सर्वात महागडी खेळाडू ठरली. तिला यूपी वॉरियर्सने 1.1 कोटी रुपयांना विकत घेतले. सोफी मोलिनक्सची बेस प्राईस 50 लाख रुपये होती. भारतीय क्रिकेटपटूंमध्ये किरण नवगिरे ही सर्वात महागडी खेळाडू ठरली, जिला दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघात सामील केले. दिल्लीच्या फ्रँचायझीने उमा काशवीलाही आपल्या संघात घेतले आहे.
कोण आहे उमा काश्वी?
भारताच्या पुरुष संघाने जेव्हा 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकलेला तेव्हा एक आठवड्यापूर्वी उमा काश्वीचा जन्म झाला होता. उमा काश्वी चा जन्म 9 एप्रिल 2011 मध्ये झाला होता. वैभव सुर्यवंशीने वयाच्या 15 व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केले. मात्र जेव्हा राजस्थान रॉयल्सने त्याला विकत घेतले तेव्हा वैभवचे वय अवघे 14 वर्षे होते. राजस्थानने त्याला 1.1 कोटी रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतले, ज्यामुळे तो आयपीएलच्या इतिहासात एखाद्या संघाद्वारे करारबद्ध झालेला सर्वात तरुण खेळाडू ठरला. महिला प्रीमियर लीगमध्ये करार मिळवणारी उमा काश्वी सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे. यापूर्वी हरियाणाची दीया यादव हिच्या नावावर हा रेकॉर्ड होता. ती महिला वर्षी दिल्ली कॅपिटल्समध्ये सहभागी झालेली. दियाला 16 व्या वर्षी WPL चं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं.
उमा काश्वी हि जेव्हा 7 वर्षांची होती तेव्हा पासून तिने घराजवळ असलेल्या एका क्रिकेट अकादमीतून खेळणं सुरु केलं. ती लागोपाठ चांगली कामगिरी करत राहिली. आता, वयाच्या 15 व्या वर्षी, तिने वुमेन्स प्रीमियर लीगमध्ये स्थान मिळवले आहे. तिथे आपल्या कामगिरीच्या जोरावर ती राष्ट्रीय संघातही स्थान मिळवू शकते. वैभव सूर्यवंशीची गोष्टही काहीशी अशीच आहे. आयपीएलमध्ये पदार्पण करण्यापूर्वी, तो देखील प्रामुख्याने त्याच्या वयामुळे चर्चेत होता. पुढे त्याने आपल्या कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय संघात स्थान मिळवू शकते.