WPL 2027 Auction : महिला प्रीमियर लीगचा 5 वा सीजन आयोजित होणार आहे. येत्या काही महिन्यात हा सीजन सुरु होणार असून यासाठी बुधवार 28 ऑक्टोबर रोजी मिनी ऑक्शन पार पडलं. या ऑक्शनमध्ये एकूण 150 खेळाडूंवर बोली लावण्यात आली. यंदाच्या WPL 2027 ऑक्शनमध्ये ऑस्ट्रेलियाची सोफी मोलिनेक्स ही सर्वात महागडी खेळाडू ठरली. सोफीला यूपी वॉरियर्सने 1.10 कोटी रुपयांना विकत घेतले. तर सोलापूरची कन्या किरण नवगिरे हिला दिल्ली कॅपिटल्स 75 लाख रुपये देऊन आपल्या संघात सामील करण्यात आले. ती WPL 2027 ऑक्शनमधली सर्वात महागडी भारतीय खेळाडू ठरली जिच्यावर मोठी बोली लागली. यांच्या सह महिला प्रीमियर लीग 2027 च्या ऑक्शनमध्ये महागड्या ठरलेल्या खेळाडूंविषयी जाणून घेऊयात.
किरण नवगिरे :
भारतीय बल्लेबाज किरण नवगिरे ही या ऑक्शनची दुसरी सर्वात महागडी खेळाडू ठरली. किरणची बेस प्राईज ही 40 लाख रुपये होती, परंतु दिल्ली कॅपिटल्सने तिला 75 लाख रुपयांना विकत घेतले. मुंबई इंडियन्सनेही तिच्यासाठी बोली लावली होती, मात्र अखेरीस दिल्लीच्या संघाने तिला आपल्या संघात सामील करून घेण्यात यश मिळवलं.
जी. कमलिनी :
भारतीय विकेटकीपर फलंदाज जी. कामलिनीला गुजरात जायंट्सने 40 लाख रुपयांना विकत घेतले. तिची मूळ किंमतही 40 लाख रुपयेच होती. मुंबई इंडियन्सशीमधून बाहेर पडल्यावर, आता जी. कमलिनी गुजरातच्या संघाकडून खेळताना दिसेल.
ग्रेस हॅरिस :
ऑस्ट्रेलियाची आक्रमक फलंदाज ग्रेस हॅरिस हिला यूपी वॉरियर्सने 30 लाख रुपयांना खरेदी केले.हॅरिच्या परतण्यामुळे संघाला फलंदाजी विभागात एक अनुभवी पर्याय उपलब्ध होईल.
स्नेह राणा :
भारतीय ऑलराउंडर खेळाडू स्नेह राणा हिला यूपी वॉरियर्सने 30 लाख रुपयांना विकत घेतले. स्नेह राणा हिला तिच्या बेस प्राईजवर यूपीने विकत घेतलं. गोलंदाजीसोबतच गरज पडल्यास ती फलंदाजीद्वारेही संघासाठी योगदान देऊ शकते.
30 लाख रुपयांना अनेक खेळाडूंना खरेदी केलं :
ग्रेस हॅरिस आणि स्नेह राणा यांच्यासोबतच, सुषमा वर्मालाही यूपी वॉरियर्सने 30 लाख रुपयांना विकत घेतले. आयर्लंडची ऑलराऊंडर खेळाडू ओर्ला प्रेंडरगास्ट गुजरात जायंट्समध्ये सामील झाली. तिलाही 30 लाख रुपयांतच विकत घेण्यात आले.