देहविक्री रॅकेटमधून 2 अभिनेत्रींची सुटका! मीरा-भाईंदरमधील हॉटेलच्या छाप्यात काय सापडलं? गोवा कनेक्शनही समोर
मीरा-भाईंदरमधील हॉटेलच्या छाप्यात मोठ्या देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश करत दोन अभिनेत्रींची सुटका करण्यात आली आहे. तर एका महिला एजंटला पोलिसांनी अटक केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईदरमध्ये एका हॉटेलमध्ये देहविक्रीचा काळा धंदा सुरू असल्याची माहिती मिळतात, याठिकाणी छापा टाकण्यात आला. या देहविक्रीच्या दलदलीतून दोन अभिनेत्रींची सुटका करण्यात आली आहे. तर पोलिसांनी एका महिला एजंटला ताब्यात घेतलं आहे.
ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईदर, वसई आणि विरार पोलीस आयुक्तालयाच्या नवघर पोलीस स्टेशन पथकाला टीप मिळाली होती. 'द डी पिझ्झा हॉटेल' जवळील 'सिल्व्हर क्लाउड हॉटेल' मध्ये देहविक्रीचे रॅकेट सुरू आहे. इथे एक महिला एजंट मॉडेलिंग, फोटोशूट आणि बंगाली मालिकांसाठी ग्राहकांना वेश्याव्यवसायाकरिता मुली पुरवते. ती 'सिल्व्हर क्लाउड हॉटेल'च्या पहिल्या मजल्यावर, धर्मकांटा फाटक रोडवरील शिवराज चेंबरमध्ये येणार आहे.
या टीपनंतर 'सिल्व्हर क्लाउड हॉटेल' आणि 'द डी पिझ्झा हॉटेल'ला एक बनावट ग्राहक पाठवण्यात आला. त्यानंतर नवघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद यादव आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय धुमेसह पथकाने या ठिकाणी धाड टाकली. त्या ठिकाणाहून एका महिला एजंट अटक तर दोन पीडित तरूणींची सुटका करण्यात आली. तर एक महिला एजंट फरार आहे.
पोलिसांनी सांगितलं की, अटक केलेली महिला एजंट आणि फरार महिला एजंट या लोणावळा, गोवा, मुंबई, ठाणे आणि मीरा भाईंदर येथील ग्राहकांना फोटोशूट, मॉडेलिंग आणि बंगाली मालिकांमध्ये काम करणाऱ्या मुलींचे फोटो पाठवून त्यांना देहविक्रीच्या दलदलमध्ये खेचत होत्या.
दरम्यान आता फरार महिलेच्या शोधण्यासाठी नवघर पोलीस ठाण्याचे पथक सक्रीय झाले आहे. तर अटकेतील महिला एजंटकडून एक मोबाईल फोन, रोकड आणि सीलबंद कंडोमची पाकिटे पोलिसांनी जप्त केली आहेत.
या देहविक्री रॅकेटमधील अटक केलेल्या महिला एजंट आणि फरार महिला एजंटच्या साथीदारांचा, तसंच मॉडेलिंग, फोटो शूट आणि मालिकांमध्ये काम करणाऱ्या आणखी किती मुलींना वेश्याव्यवसायात ओढले गेले आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.
पोलिसांनी माहिती दिली की, अटक करण्यात आलेल्या महिला एजंट आणि पीडित मुलींनी काम बंगाली मालिका आणि फोटोशूट केली आहे. यामध्ये
रूपोशी बांगला चॅनल - ही बरेली बंधू
ई टीव्ही - सांझ बाती
स्टार जलसा चॅनल - टॉक शो
बंगाली टीव्ही शो - हजार घंटा
दागिने डिझायनिंग - फोटोशूट
साडी आणि लेहेंगा - फोटोशूट
नवघर पोलीस स्टेशनचे पथक अटक करण्यात आलेल्या महिला एजंट आणि फरार महिला एजंटवर बीएनएस (BNS) आणि पीटा (PITA) कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई केली आहे. तर दोन्ही पीडित मुलींना महिला सुधारगृहात कोठडीत ठेवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करण्यात येत आहे.
नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली, एमबीव्हीव्ही पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ अधिकारी, झोन 1 चे डीसीपी राहुल चव्हाण (आयपीएस), एसीपी सोहेल शेख, नवघर पोलीस ठाण्याचे पीआय दत्तात्रय धुमे, एपीआय विश्वास बाबर आणि नवघर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे या देहविक्री व्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.