SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

ठाणे महापालिकेतील स्थायी समितीची सभासदांची नावे जाहीर, कोणाला मिळाली संधी?

ठाण्यातून मोठी बातमी आहे. ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या 16 सदस्यांची नावं जाहीर करण्यात आली आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 20, 2026, 14:52 IST | Updated: Nov 20, 2026, 15:28 IST
Image Credit: Thane Mahanagarpalika Standing Committee
Join

उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे त्यांच्या धक्कातंत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रसिद्ध आहेत. एकनाथ शिंदे यांनी  ठाणे महानगरपालिकेचा सभापती निवडीत धक्कातंत्राचा वापर केला आहे. गेल्या 10 महिन्यांपासून उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही रखडलेल्या ठाणे महानगरपालिका स्थायी समितीच्या सदस्यांची निवडणूक झाली आहे. आज शुक्रवारी 16 सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सदस्यांची निवड करताना धक्कातंत्राचा वापर करत सभागृहातील पक्षीय बलाबलानुसार स्थायी समितीची निवड करण्यात आली आहे. यात शिवसेनेचे सर्वाधिक 9, भाजपचे3, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 2, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि एमआयएमचा प्रत्येकी 1 सदस्य निवडण्यात आले आहेत.

शिवसेना
दिलीप बारटक्के, राजेश मोरे, पवन कदम, बाबाजी पाटील, संध्या मोरे, प्रमिला केणी, आदेश भगत, विक्रांत तांडेल, महेश साळवी

भाजप 
भरत चव्हाण, मृणाल पेंडसे, कमल चौधरी

राष्ट्रवादी (श प) 
पल्लवी जगताप, यासीन कुरेशी

राष्ट्रवादी (अ प)
सुहास देसाई

एमआयएम
शोएब डोंगरे 

दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपची स्वीकृत नगरसेवकांची नाव महापौरांकडून जाहीर करण्यात आली आहे. 

महापौरांकडून भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांची नावं जाहीर...!

सचिन साठे
जयनाथ काटे
विशाल कलाटे
कुणाल लांडगे
राजेश पिल्ले 
कुलदीप परांडे
ऋषिकेश म्हेत्रे

राष्ट्रवादी स्वीकृत यादी या पूर्वीच झाली आहे जाहीर...! 


१.सीमा सावळे
२.फजल शेख
३.राजेंद्र जगताप


Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES