• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /ठाणे
  • /ठाणे ते नवी मुंबई विमानतळ अवघ्या 20 मिनिटांत, सिडको बांधणार नवा सहा पदरी उन्नत मार्ग

ठाणे ते नवी मुंबई विमानतळ अवघ्या 20 मिनिटांत, सिडको बांधणार नवा सहा पदरी उन्नत मार्ग

ठाणे ते नवी मुंबई विमानतळ अवघ्या 20 मिनिटांत पोहोचता येणार आहे. सहा हजार कोटींच्या 25 कि.मी. एलिव्हेटेड रस्त्याचे टेंडर निघाले आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 08, 2026, 11:00 IST|Updated: Nov 08, 2026, 11:02 IST
joinshare
ठाणे ते नवी मुंबई विमानतळ अवघ्या 20 मिनिटांत, सिडको बांधणार नवा सहा पदरी उन्नत मार्ग
Image Credit: Thane to Navi Mumbai Airport Elevated Road six lane elevated road

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
नांदेडमध्ये चक्क स्मशानभूमीत पार पडला साखरपुडा! कारण हादरवणारं, वडील म्हणाले 'लोकांकडून आम्हाला...'

नांदेडमध्ये चक्क स्मशानभूमीत पार पडला साखरपुडा! कारण हादरवणारं, वडील म्हणाले 'लोकांकडून आम्हाला...'

2

पुण्यात प्रियकराकडून प्रेयसीची हत्या, नंतर रात्रभर...; अखेर सकाळी स्वत:च केला पोलिसांना फोन अन्...; हादरवणारी घटना

3

मैदानात केएल राहुल सोबत ऋषभ पंतचा ब्रोमान्स, Video पाहून तुम्हीही हसू रोखू शकणार नाही

4

Fact Check:'प्रत्येक नागरिकाच्या खात्यात ३० हजार रुपये' तुम्हाला आला का मेसेज? PIB ने सांगितले सत्य!

5

मेहुण्याने लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या दोन्ही भावोजींच्या गळ्यात घातला 100 फूट लांब 1-1 कोटींच्या नोटांचा हार; VIDEO तुफान व्हायरल

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

ठाणे ते नवी मुंबई हे दोन टोकाचे अंतर पार करण्यासाठी साधारण दीड ते दोन तासांचा अंतर लागते. मात्र आता ठाणे ते नवी मुंबई विमानतळ हे अंतर फक्त 20 मिनिटांत गाठणे शक्य होणार आहे. सिडकोने कोपरीपासून ते विमानतळापर्यंत सुमारे 25 किलोमीटर एलिव्हेटेड मार्गाचे सुमारे सहा हजार कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. या मार्गामुळं ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूककोंडी फुटणार आहे.

ठाणे ते नवी मुंबई उन्नत मार्ग ठाणे येथून सुरू होऊन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जाणार आहे. कोपरी-पटणी खाडी पूल, ऐरोली-काटई मार्ग, घाटकोपर-कोपरखैरणे जोडरस्ता, शीव-पनवेल महामार्ग, पामबीच मार्ग आणि उलवे किनारी मार्ग अशा सहा ठिकाणी तो जोडला जाणार आहे.

एकदा का हा मार्ग सुरू झाला की हलकी व्यावसायिक आणि प्रवासी वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे. अवजड बहुआसनी वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या सक्षम समितीने मार्गाच्या खर्चास मंजुरी दिली आहे. या सहापदरी मार्गामुळे ठाणे-बेत्पूर मार्गावरील वाहतूककोंडी फुटणार आहे. हा उन्नत मार्ग तयार झाल्यानंतर ठाण्यातून नवी मुंचई विमानतळ गाठणे अवघ्या 20 मिनिटांत शक्य होणार आहे.

ठाण्यातून नवी मुंबई विमानतळावर जाण्यासाठी नागरिकांना ठाणे-बेलापूर मार्गे किंवा शिळफाटा-तळोजा मार्गाने कंळबोली सर्कलमार्गे जावे लागते. मात्र या दोन्ही मार्गावर मोठी वाहतूक कोंडी असते. त्यामुळं या नव्या सहापदरी उन्नत मार्गाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. कोपरी ते विमानतळादरम्यानच्या या रस्त्यामुळं प्रवास सुस्साट होणार आहे.

दरम्यान, या मार्गासाठी सिडकोने 6 हजार 27 कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. या टेंडरमध्ये दरपत्रक सादर करण्याची अंतिम मुदत 5 जानेवारीपर्यंत आहे. तसंच, या प्रकल्पाचा कालावधी 40 वर्षांचा असणार आहे. यामध्ये बांधकामासाठी तीन वर्षे असा कालावधी ठेवण्यात आला आहे.

विमानतळाला जोडणाऱ्या या उन्नत मार्गावर वाहनांची वेगमर्यादा ताशी 100 किमीवर ठेवण्यात येणार आहे. तसंच, या मार्गाचा उपयोग करणाऱ्या वाहनचालकांना टोलही भरावा लागणार आहे. हा मार्ग नवी मुंबई परिसरातील सहा ठिकाणी जोडण्यात येणार आहे. तसंच, नव्याने तयार होत असलेल्या घणसोली-ऐरोली खाडी पुलाला समांतर असणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Thane
Mumbai News
Infrastructure news