SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

शिंदेंच्या शाखाप्रमुखावर हल्ला; शिवसेना नगरसेवकाच्या पुतण्याने डायरेक्ट चाकू काढला आणि... हल्ल्याचे कारण अत्यंत धक्कादायक

शिंदे गटाच्या शाखाप्रमुखावर चाकूने जीवघेणा हल्ला झाला आहे, शिवसेना नगरसेवकाच्या पुतण्यावर हल्ल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 11, 2026, 18:05 IST | Updated: Nov 11, 2026, 18:09 IST
Join

उल्हासनगर क्राईम :  शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुखावर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. उल्हासनगरमध्ये ही घटना घडली आहे.  शिंदे गटाच्या नगरसेवकाच्या पुतण्याने हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेनंतर  आरोपी फरार आहे. शाखाप्रमुख पदाच्या वादावरून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती  समोर आली आहे. 

उल्हासनगर शहरात राजकीय वर्चस्व आणि आपापसातील वादातून एक गंभीर घटना समोर आली आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मराठा सेक्शन परिसरातील शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुख विशाल माणिक वाविस्कर यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात विशाल वाविस्कर यांच्या पाठीवर तसेच दोन्ही मनगटांवर चाकूने अनेक वार करण्यात आले असून, ते गंभीर जखमी झाले आहेत. 

या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक चंद्रशेखर यादव यांचे पुतणे चिराग राकेश यादव (वय 23 ते 24 वर्ष) याच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर आरोपी फरार असून विठ्ठलवाडी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शाखाप्रमुख पदावरून अनेक दिवसापासून वासरू होता या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

नागपुरातील वाडी परिसरात तरुणावर चाकू हल्ला

नागपूर शहरातील वाडी परिसरात एका तरुणावर तिघांनी मिळून चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. वैभव बैस असे जखमी तरुणाचे नाव असून, या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे. संपूर्ण हल्ल्याचा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे..

मिळालेल्या माहितीनुसार, वैभव हा दुकानात काम करतो. तिघा हल्लेखोरांनी सुरुवातीला दुकानाबाहेर वैभववर चाकूने वार केले. त्यानंतर दुकानात घुसून पुन्हा त्याच्यावर चाकूने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली.

दरम्यान, दुकानमालक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी हल्लेखोरांना तेथून हटवले. त्यानंतर गंभीर जखमी वैभवला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.  हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच वाडी पोलिसांनी तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तिन्ही हल्लेखोरांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES