SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

पाणीपुरी विक्रेत्याच्या दारात स्कॉर्पिओसह 4 अलिशान कार; कमाई पाहून IIT डिग्री असलेली तरुणी झाली शॉक

एका पाणीपुरी विक्रेत्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. एका तरुणीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पाणीपुरी विक्रेत्याने आपला कमाईचा आकडा देखील सांगितला आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 07, 2026, 06:39 PM IST | Updated: Nov 07, 2026, 06:45 PM IST
Join

व्हायरल न्यूज : सोशल मिडियावर एक पाणीपुरी विक्रेता चांगलाच व्हायरल झाला आहे. या पाणीपुरी विक्रेत्याने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्याच्या घराबाहेर  स्कॉर्पिओसह 4 अलिशान कार उभ्या असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या व्हिडिओमुळे त्याची कमाई उघड झाली आहे. त्याची कमाई आणि डिग्री पाहून सगळे शॉक झाले आहेत. 

एका आयआयटी पदवीधर तरुणीने पाणीपुरी विक्रेत्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. ही तरुणी या पाणीपुरी विक्रेत्याच्या स्टॉलवर पाणीपुरी खाण्यासाठी गेला होता. पाणीपुरी खात असताना तिने पाणीपुरी विक्रेत्याशी गप्पा मारल्या. बोलता बोलता पाणीपुरी विक्रेत्याने त्याचा कमाईचा आकडा सांगितला. हा आकडा ऐकून तरुणी शॉक झाली. पाणीपुरी विक्रेत्याची कमाई, कामाचे तास आणि जीवनशैली पाहून या सुशिक्षित तरुणीला तिच्या कॉर्पोरेट नोकरीबद्दल अत्यंत वाईट वाटले. 

आयआयटी गुवाहाटीची पदवीधर असलेल्या वैष्णवी श्रीवास्तवने, आयआयटी दिल्ली, आयआयटी कानपूर आणि आयआयटी हैदराबाद येथील तिच्या तीन मैत्रिणींसोबत इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे हा पाणीपुरी विक्रेता ट्रेंडिंगमध्ये आला.

6 तासात 1.2 लाख रुपयांचा निव्वळ नफा

बोलता बोलता या पाणीपुरी विक्रेत्याने तरुणीला आपल्या कमाईचा आकडा सांगितला. एका पाणीपुरी स्टॉलवरुन महिन्याला 1,20,000 रुपये कमावल्याचे त्याने सांगितले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही त्याची एकूण विक्री नसून, सर्व खर्च वजा केल्यानंतरचा निव्वळ नफा आहे.

पाणीपुरी विक्रेता दुपारी 4 वाजता स्टॉल लावतो. रात्री 10 वाजेपर्यंत घरी जातो.  दिवसातून फक्त सहा तासच तो काम करतो. तो स्वतःचा मालक आहे.  त्याला वाटलं तर तो रविवारी सुट्टी घेतो. पाणीपुरी विक्रेता गप्पा मारताना जे काही सांगत होता ते एेकून या तरुणीला एका मागून एक आश्चर्याचे धक्के बसत होते.  

पाणीपुरीचे 4 स्टॉल, 4.5 लाख रुपये कमाई आणि स्वतःची स्कॉर्पिओ

या पाणीपुरी विक्रेत्याचे 4 स्टॉल आहेत. या चौघांचा नफा एकत्र केल्यास हा पाणीपुरी विक्रेता महिन्याला साडेचार लाख रुपयांपेक्षा जास्त नफा कमावतो. हा पाणीपुरी विक्रेता अलिशान घरात राहतो. त्याच्या दारात स्कॉर्पिओसह 4 कार उभ्या आहेत. या तरुणीने सोशल मिडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव होत आहेत. कमेंट करणारे पाणीपुरी विक्रेत्याची कमाई पाहून थक्क झाले आहेत. आमच्या डिग्रीचा काय उपयोग? असा सवाल अनेकजण उपस्थित करत आहे. तर, चला नोकरी सोडून पाणीपुरीचा ठेला टाकूया अशी मजेशीर कमेंट काहीजण करत आहेत. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES