• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /नॅनो युरिया पाजलं, नंतर तोंडात कापड कोंबलं अन् त्याच अवस्थेत...; गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट, गुगल सर्च हिस्ट्री हादरवणारी

नॅनो युरिया पाजलं, नंतर तोंडात कापड कोंबलं अन् त्याच अवस्थेत...; गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट, गुगल सर्च हिस्ट्री हादरवणारी

पतीने आपल्या आई, भावजय आणि भावासोबत मिळून गर्भवती पत्नीची अत्यंत निर्दयीपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्येनंतर ही आत्महत्या असल्याचा दाखवण्याचा प्रयत्नही करण्यात आला.

Reported ByShivraj Yadav
Published: Oct 23, 2026, 05:50 PM IST|Updated: Oct 23, 2026, 05:53 PM IST
joinshare
नॅनो युरिया पाजलं, नंतर तोंडात कापड कोंबलं अन् त्याच अवस्थेत...; गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट, गुगल सर्च हिस्ट्री हादरवणारी
Image Credit: गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पतीने आपल्या आई, भावजय आणि भावासोबत मिळून गर्भवती पत्नीची अत्यंत निर्दयीपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील महुधा तालुक्यातून ही घटना घडली आहे. पीडिता 13 आठवड्यांची गर्भवती होती. पोलिसांच्या तपासात काही धक्कादायक खुलासे झाले आहेत. सुरुवातीला महिलेने आत्महत्या केली असल्याचं भासवले गेलेले हे प्रकरण प्रत्यक्षात हत्या असल्याचं निष्पन्न झालं.

चारित्र्यावरील संशय आणि इतर वैयक्तिक वादांतून निर्माण झालेला तणाव

17 ऑक्टोबरच्या पहाटे, महुधा पोलिसांना माहिती मिळाली की, अरुणाबेन मितुलभाई सोढा हिने आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत महिलेच्या माहेरच्यांनी पहिल्या दिवसापासूनच ही हत्या असल्याचा संशय व्यक्त केला होता. पोलीस तपासात असे समोर आले की, घटनेच्या रात्री 13 आठवड्यांची गर्भवती असलेली अरुणाबेन पोटदुखीने तीव्र वेदनेत होती. तिने पती मितुलला तिला रुग्णालयात नेण्याची विनंती केली, परंतु मितुलने त्याकडे दुर्लक्ष करून तो मोबाईल फोनमध्ये व्यग्र होता.

या जोडप्यामध्ये आधीच तणाव होता. कारण तीन-चार दिवसांपूर्वीच मितुल आपल्या मेहुणीला (पत्नीच्या बहिणीला) बँकेच्या कामासाठी बाहेर घेऊन गेला होता. त्यात आता गर्भवती पत्नीला रुग्णालयात नेण्यास तो टाळाटाळ करत होता. त्यांच्यात चारित्र्याबाबतच्या संशयावरून आणि इतर वैयक्तिक कारणांमुळे आधीपासूनच वाद सुरू होते.

एका वादादरम्यान, वैतागलेल्या अरुणाबेनने रागाच्या भरात "मी मरून जाईन!" असे म्हटले. यानंतर मितुलच्या मनात हत्येचा कट शिजला. त्याने लगेच गुगलवर शोधले, "जर पत्नीने आत्महत्या केली, तर पतीला जबाबदार धरले जाते का?" त्यानंतर, अरुणबेनचा जीव घेण्यासाठी संपूर्ण कुटुंबाने मिळून एक कट रचला.

घरात आधीच उपलब्ध असलेले 'नॅनो युरिया'चे 500 मिलीचे पाकीट बाहेर काढण्यात आले. सासू आणि नणंदेने गरोदर अरुणबेनचे हात-पाय घट्ट पकडून ठेवले. मितुलने तिला सोफ्यावर पाडले आणि बळजबरीने तिच्या तोंडात युरिया ओतला. ती ओरडू नये किंवा प्रतिकार करू नये म्हणून त्यांनी तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला. युरिया पोटात गेल्यावर त्याचे रूपांतर अमोनिया गॅसमध्ये झाले, ज्यामुळे तिचे श्वसन स्नायू निकामी झाले. अवघ्या 15 ते 20 मिनिटांत अरुणाबेन आणि तिच्या गर्भातील निष्पाप बाळाचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालातून हे सत्य समोर आले.

हत्येनंतर, संपूर्ण कुटुंब रात्रभर एकत्र बसून हा गुन्हा लपवण्याची योजना आखत होते. रात्री उशिरा, मितुलने आपला मेहुणा विपुल याच्या मदतीने अरुणबेनचा मृतदेह नायलॉनच्या दोरीने लटकवला, जेणेकरून पोलिसांना तिने आत्महत्या केली आहे असे वाटावे. मात्र शवविच्छेदन अहवालातून सत्य उघड झाले. गळ्यावरील खुणांवरुन हत्या झाल्याचे आणि विषारी पदार्थ पोटात गेल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. याव्यतिरिक्त, तांत्रिक पुरावे आणि गुगलवरील सर्च हिस्ट्रीमुळे मितुलचा खरा चेहरा उघड झाला.

पोलिसांनी या भीषण दुहेरी हत्याकांडाचा काही तासांतच छडा लावला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी पती मितुल सोढा आणि त्याचा मेहुणा विपुल सोढा यांना अटक केली आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली नायलॉनची दोरी, तसेच मोबाईल फोन आणि एक ब्लेडही जप्त केले आहे. मात्र, या भीषण गुन्ह्यात मदत करणाऱ्या सासू आणि नणंद अजूनही फरार आहेत. 

Add Zee News as a Preferred Source