• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /टायगर श्रॉफची एक्स गर्लफ्रेंड रडारवर? अभिनेत्रीच्या मुंबईसह यूपीच्या घराची सुरक्षा वाढवली, वर्षभरापूर्वी...

टायगर श्रॉफची एक्स गर्लफ्रेंड रडारवर? अभिनेत्रीच्या मुंबईसह यूपीच्या घराची सुरक्षा वाढवली, वर्षभरापूर्वी...

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात अनेक धक्कादायक अपडेट समोर येत असताना आता टायगरची मैत्रिण दिशा पाटणी हिच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 21, 2026, 09:24 AM IST|Updated: Oct 21, 2026, 09:54 AM IST
joinshare
टायगर श्रॉफची एक्स गर्लफ्रेंड रडारवर? अभिनेत्रीच्या मुंबईसह यूपीच्या घराची सुरक्षा वाढवली, वर्षभरापूर्वी...
Image Credit: Actress Disha Patani Bareilly House Security increased

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर अनेक कलाकारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अभिनेता सलमान खानच्या घरीदेखील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर, अभिनेत्री दिशा पाटाणीच्या घराबाहेरही पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  

टायगर श्रॉफची जवळची मैत्रणी अभिनेत्री दिशा पाटणी हिच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील बरेली येथील दिशाच्या मुळ निवासस्थानी तिचे कुटुंब राहते. सोमवारपासून तिथे सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या आधीही दिशा पाटणीच्या घरावर हल्ला करण्यात आला होता.

दिशा पाटणीच्या घरावर 12 सप्टेंबर 2025मध्ये गोळीबार करण्यात आला होता. बरेली येथील दिशाच्या घराबाहेर हल्ला करण्यात आला होता. बाईकवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी सुमारे 10 राउंड गोळीबार केला होता. या हल्ल्यानंतर हल्लेखोरांचा एन्काउंटर करण्यात आला होता.

या घटनेप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर 17 सप्टेंबर 2025 रोजी गाझियाबादमध्ये झालेल्या एका चकमकीत रवींद्र आणि अरुण नावाच्या दोन संशयितांचा मृत्यू झाला होता. ही कारवाई उत्तर प्रदेश पोलिसांचे विशेष कृती दल, हरियाणा टास्क फोर्स आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली होती. 2025मध्ये दिशाच्या घराबाहेर गोळीबार का करण्यात आला होता. हे मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आले नाहीये.

दरम्यान, टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर दिशा पाटणीने दुसऱ्याच दिवशी त्याच्या घरी जात त्याची भेट घेतली होती. टायगरवर झालेल्या हल्ल्यानंतर दिशाही अस्वस्थ असल्याचं तिच्या चेहऱ्यावरून पाहायला मिळालं. टायगर आणि दिशा हे बेस्ट फ्रेंड असल्याचं बोललं जाते. तसंच, सहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांचंही ब्रेकअप झाल्याचे सांगण्यात येते. मात्र यगर आणि दिशा आता एकत्र नसले, तरी दोघांमध्ये आजही चांगली मैत्री असल्याची चर्चा आहे. दिशा ही टायगरची बहीण कृष्णा श्रॉफचीही जवळची मैत्रीण आहे. त्यामुळे टायगरच्या कठीण काळात त्याला भेटण्यासाठी दिशा पोहोचल्याने त्यांच्या नात्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

सलमान खानच्या सुरक्षेत वाढ

टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान 2024मध्ये सलमान खानच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबारानंतर त्याला मुंबई पोलिसांकडून वाय-प्लस सुरक्षा पुरवली जाते. ज्याअंतर्गंत त्याच्या घराबाहेर 24 तास पोलीस तैनात असतात. तसंच, तो जिथे जातो तिथे जीपमधून सशस्त्र पोलीस त्याच्यासोबत असतात.  तसंच, सलमान जिथे भेट देणार असेल त्या ठिकाणांची स्थानिक पोलिस पथकांकडून तपासणी केली जाते. तसंच, त्याच्यासोबत असलेल्या सुरक्षा पथकांव्यतिरिक्त, तो भेट देत असलेल्या ठिकाणी अतिरिक्त कर्मचारीही तैनात केले जातात. आता त्याच्या अपार्टमेंटजवळ बॅरिकेड्स उभारून त्याची सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Tiger Shroff
Disha Patani
Salman Khan