विक्रमी दरानंतर सोनं तब्बल 50,000 रुपयांनी तर चांदी 2.40 लाखांनी स्वस्त; भर दिवाळीत गोल्ड मार्केट क्रॅश
भर दिवाळीत सोनं चांदीचे दर घसरले आहेत. सोनं तब्बल 50,000 रुपयांनी तर चांदी 2.40 लाखांनी स्वस्त झाली आहे.
Gold Silver Fall: सोनं चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली. सकाळी सराफा बाजारत तेजी होती. मात्र, सायंकाळी व्यवहार सुरू होताच सोन्याच्या दरात अचानक घसरण झाली. मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर (MCX), सोन्याचा दर 2,000 पेक्षा जास्त घसरला. एक तोळा सोन्याचा दर 1.41 लाखांच्या खाली आला. सोन्याच्या दरात अंदाजे 1.50 टक्क्यांची घसरण झाली आहे. सोन्याचा दर 2026 मधीस आतापर्यंतच्या उच्चांकावरून प्रति 10 ग्रॅम ₹50,000 ने घसरला आहे.
एमसीएक्सवर चांदीच्या दरात सुमारे 2 टक्क्यांची घसरण होत आहे. चांदीचे दरही 3,400 रुपयांनी घसरले आहेत. 10 नोव्हेंबर रोजी बाजार बंद होताना चांदीचा दर घसरून 1,83,788 प्रति किलो झाला. सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. ॉ
चांदीचे दर घसरले
जानेवारी 2026 मध्ये चांदीचा दर 4.21 लाखांच्या वर गेला होता. चांदीच्या दरातही जानेवारी महिन्यातील उच्चांकावरून लक्षणीय घसरण झाली आहे. जानेवारीमध्ये एमसीएक्सवर चांदीचा दर 4.21 लाख रुपये प्रति किलोपर्यंत वाढला होता. चांदीच्या दरात प्रति किलो अंदाजे 2.40 लाख रुपयांची प्रति किलोची घसरण झाली आहे. चांदीचा दर वर्षभरातील नीचांकी पातळीवरही घसरले आहेत.
सोनं चांदीचे दर का घसरत आहेत?
जागतिक अर्थव्यवस्थेत प्रचंड अस्थिरता आली आहे. यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीच्या भीतीमुळे सोने आणि चांदीच्या किमतींवर दबाव वाढत आहे. गेल्या महिन्याभरात सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसण होत आहे.