Airtel Voice Calling Only Plans : ग्राहकावर बरदस्ती इंटरनेटसहीत डेटा प्लान लादणाऱ्या दूरसंचार कंपन्यांना ट्रायने दणका दिला आहे. ग्राहकांना तातडीने फक्त कॉलिंग प्लान उपलब्ध करुन देण्याचे आदेश ट्रायने दिले. यासाठी ट्रायने दूरसंचार कंपन्यांना 21 ऑक्टोबरपर्यंतची ममुदत दिली आहे. ट्रायच्या आदेशानंतर Airtel ने फक्त कॉलिंगसाठी 3 नवे जबरदस्त आणि सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान लाँच केले आहेत.
ग्राहाकांना तातडीने फक्त कॉलिंगसाठी रिचार्ज प्लान उपलब्ध करुन द्यावा असे आदेश देण्यात आले. 21 ऑक्टोबरपर्यंत वेबसाइट्स आणि ॲप्सवर परवडणारे कॉलिंग प्लॅन्स जाहीर करावेत असे निर्देश ट्रायने दिले होते. या निर्देशानुसार एअरटेल कंपनीने आपले नवे कॉलिंग प्लान जाहीर केले आहेत. एअरटेल ॲपवर केवळ कॉलिंगची सुविधा असलेले तीन प्लॅन्स दिसत आहेत. हे प्लॅन्स ट्रायच्या आदेशानुसार आणले गेले आहेत की नाही, याबबात एअरटेलने अद्याप कोणहीती माहिती दिलेली नाही. एअरटेलच्या ॲपवर 3 कॉलिंग प्लान दिसत आहेत. हे प्लॅन्स 158 रुपयांपासून ते 206 रुपयांपर्यंत आहेत.
ट्रायने कंपन्यांना हे प्लॅन्स ॲप आणि वेबसाइटवर स्वतंत्र विभागांमध्ये उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तथापि, सध्या प्लान ॲपच्या 'ट्रुली अनलिमिटेड' कॅटेगरीमध्येच दिसत आहेत. ॲपवर किंमतीनुसार हे प्लान सर्च करता येवू शकतात.
एअरटेलचा स्वस्त कॉलिंग प्लॅन्स 185 रुपयांपासून सुरू होतो. ज्या ग्राहकांना इंटरनेट वापरायचे नाही. फक्त कॉल करायचे आहेत किंवा ज्यांना अतिरिक्त सिम चालू ठेवायचे आहे, त्यांच्यासाठी हे प्लान आहेत. या पॅकची वैधता 28 दिवसांची आहे. हा फक्त कॉलिंग प्लान असल्यामुळे यात रिचार्ज केल्यावर इंटरनेट ॲक्सेस मिळत नाही. वापरकर्त्यांना त्यांच्या डिव्हाइसवर वाय-फाय आणि हॉटस्पॉटद्वारे इंटरनेट वापरता येईल.
हा अमर्यादित कॉलिंग प्लान आहे. यामध्ये एसटीडी आणि रोमिंग कॉल्सचा समावेश आह. यात 300 एसएमएसदेखील मिळणार आहेत. 300 एसएमएस वापरल्यानंतर, प्रत्येक लोकल एसएमएससाठी १ रुपया आकारला जाईल. एसटीडी एसएमएससाठी 1.5 रुपये शुल्क आकारले जाईल. या पॅकने इंटरनेट वापरले तर प्रति एमबी 50 पैसे शुल्क आकारले जाणार आहे.
एअरटेलने 203 रुपयांचा देखील एक प्लान आणला आहे. 203 रुपयांचा हा 30 दिवसांचा अनलिमीटेड कॉलिंग प्लॅन आहे. या पॅकमध्ये देखील 300 एसएमएस मिळतात. 300 SMS संपल्यानंतर लोकल एसएमएससाठी 1 रुपया, तर एसटीडी एसएमएससाठी 1.5 रुपये आकारले जातील.
एअरटेलने एक महिन्याचा देखील एक प्लॅन लाँच केला आहे. हा 28 किंवा 30 दिवसांची नसून, पूर्ण एका महिन्याचा प्लान आहे. 206 रुपयांचा हा कॉलिंग प्लॅन आहे.