SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

Airtel ने फक्त कॉलिंगसाठी लाँच केले 3 नवे जबरदस्त आणि सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान

एअरटेल कंपनीने 3 नवे प्लान लाँच केले आहेत. हे फक्त कॉलिंग प्लान आहेत. ग्राहकांना फक्त कॉलिंग प्लान द्यावे असे आदेश ट्रायने दिले होते. या आदेशानंतर एअरटेलने हे प्लान उपलब्ध केले आहेत.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 19, 2026, 05:11 PM IST | Updated: Oct 19, 2026, 05:24 PM IST
Join

Airtel Voice Calling Only Plans : ग्राहकावर बरदस्ती इंटरनेटसहीत डेटा प्लान लादणाऱ्या दूरसंचार कंपन्यांना  ट्रायने दणका दिला आहे. ग्राहकांना तातडीने फक्त कॉलिंग प्लान उपलब्ध करुन देण्याचे आदेश ट्रायने दिले. यासाठी  ट्रायने दूरसंचार कंपन्यांना 21 ऑक्टोबरपर्यंतची ममुदत दिली आहे. ट्रायच्या आदेशानंतर Airtel ने फक्त कॉलिंगसाठी 3 नवे जबरदस्त आणि सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान लाँच केले आहेत. 

ग्राहाकांना तातडीने फक्त कॉलिंगसाठी रिचार्ज प्लान उपलब्ध करुन द्यावा असे आदेश देण्यात आले.  21 ऑक्टोबरपर्यंत  वेबसाइट्स आणि ॲप्सवर परवडणारे कॉलिंग प्लॅन्स जाहीर करावेत असे निर्देश ट्रायने दिले होते.  या निर्देशानुसार एअरटेल कंपनीने आपले नवे कॉलिंग प्लान जाहीर केले आहेत.  एअरटेल ॲपवर केवळ कॉलिंगची सुविधा असलेले तीन प्लॅन्स दिसत आहेत.  हे प्लॅन्स ट्रायच्या आदेशानुसार आणले गेले आहेत की नाही, याबबात एअरटेलने अद्याप कोणहीती माहिती दिलेली नाही. एअरटेलच्या ॲपवर 3 कॉलिंग प्लान दिसत आहेत. हे प्लॅन्स 158 रुपयांपासून ते 206 रुपयांपर्यंत आहेत. 

ट्रायने कंपन्यांना हे प्लॅन्स ॲप आणि वेबसाइटवर स्वतंत्र विभागांमध्ये उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तथापि, सध्या प्लान ॲपच्या 'ट्रुली अनलिमिटेड'  कॅटेगरीमध्येच दिसत आहेत.  ॲपवर किंमतीनुसार हे प्लान सर्च करता येवू शकतात.

एअरटेलचा फक्त कॉलिंग प्लान कसा आहे? 

एअरटेलचा स्वस्त कॉलिंग प्लॅन्स 185 रुपयांपासून  सुरू होतो.  ज्या ग्राहकांना इंटरनेट वापरायचे नाही. फक्त कॉल करायचे आहेत किंवा ज्यांना अतिरिक्त सिम चालू ठेवायचे आहे, त्यांच्यासाठी हे प्लान आहेत. या पॅकची वैधता 28 दिवसांची आहे. हा फक्त कॉलिंग प्लान असल्यामुळे यात रिचार्ज केल्यावर इंटरनेट ॲक्सेस मिळत नाही. वापरकर्त्यांना त्यांच्या डिव्हाइसवर वाय-फाय आणि हॉटस्पॉटद्वारे इंटरनेट वापरता येईल.

हा अमर्यादित कॉलिंग प्लान आहे. यामध्ये एसटीडी आणि रोमिंग कॉल्सचा समावेश आह. यात 300 एसएमएसदेखील मिळणार आहेत. 300 एसएमएस वापरल्यानंतर, प्रत्येक लोकल एसएमएससाठी १ रुपया आकारला जाईल. एसटीडी एसएमएससाठी 1.5 रुपये शुल्क आकारले जाईल.  या पॅकने इंटरनेट वापरले तर प्रति एमबी 50 पैसे शुल्क आकारले जाणार आहे.

203 रुपयांचा 30 दिवसांची प्लान

एअरटेलने 203 रुपयांचा देखील एक प्लान आणला आहे. 203 रुपयांचा हा 30 दिवसांचा अनलिमीटेड कॉलिंग प्लॅन आहे.  या पॅकमध्ये देखील 300 एसएमएस मिळतात. 300 SMS संपल्यानंतर लोकल एसएमएससाठी 1 रुपया, तर एसटीडी एसएमएससाठी 1.5 रुपये आकारले जातील.

1 महिन्याचा प्लान

एअरटेलने एक महिन्याचा देखील एक प्लॅन लाँच केला आहे. हा 28 किंवा 30 दिवसांची नसून, पूर्ण एका महिन्याचा प्लान आहे. 206 रुपयांचा हा कॉलिंग प्लॅन आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES