झी मीडियाने 'ऑपरेशन काला पानी'मध्ये दाखवले की, उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील ज्युबिलंट इंग्रेवियाच्या गजराउला कारखान्याजवळील रहिवाशांनी त्यांच्या कुटुंबातील मृत्यू आणि आजारपणासाठी रासायनिक कारखान्याला जबाबदार धरलंय. लोकांनी त्यांची ही व्यथा झी न्यूजवर व्यक्त केली. मग काय हे सत्य टीव्हीवर आल्यानंतर कारखान्याच्या अधिकाऱ्यांना कदाचित रुचलं नाही. असं समोर आलं की, एका गावकऱ्याला कारखान्यात बोलावून धमकी देण्यात आली, असा त्या व्यक्तीने दावा केला आहे. धमक्या मिळूनही, तो गावकरी म्हणतो की तो सत्य बोलणे थांबवणार नाही, असं सांगत तो आपल्या भूमिकेवर ठाम आहे. अशात झी न्यूजही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांचा आवाज मोठा करण्यास मागेपुढे पाहणार नाही.
ज्युबिलंट इंग्रेविया कारखान्यातील प्रदूषणाबाबत झी मीडियावरील एका बातमीतून कारखान्यातील भयान वास्तव जगासमोर आणलं. त्यानंतर या कारखान्याचे मालक आणि त्यांचं अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. झी मीडियावरील या शोमध्ये ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मांडली आणि तेव्हा कारखान्याचे अधिकारी नाराज झालं. कारण त्यामुळे कारखान्याचे भयान वास्तव अख्ख्या जगासमोर आलं. त्यानंतर टीव्हीवर सत्य सांगणाऱ्या ग्रामस्थांना कारखान्यांमधील अधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावं लागतंय. असा आरोप आहे की, कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी एका गावकऱ्याला गंभीर स्वरुपात धमकीही दिली.
झी मीडियाच्या प्रतिनिधीने गजराउला इथल्या ज्युबिलंट इंग्रेवियाचे सीएसआर अधिकारी बुंदी यांना फोनवर या धमकीबद्दल विचारणी केली. त्यांना विचारण्यात आलं की, त्यांनी त्या गावकऱ्याला धमकी दिली होती का? त्यावर बुंदी यांनी उलट आमच्या प्रतिनिधीला विचारलं की, कोणाला धमकी देण्यात आली होती आणि हा आरोप कोणी केला?
त्यावेळी आमच्या प्रतिनिधीने त्या अधिकाऱ्याला सांगितलं की, पीडित अजयपाल या व्यक्तीने हा आरोप केला आहे. यानंतर त्यालाही या फोनवरील संवादात सहभागी करण्यात आलं. अजयपालने सांगितलं की, एका डॉक्टरने किंवा तो नक्की कोण होता हे त्याला माहीत नव्हतं, त्याला विचारलं होतं की त्याने असे विधान का केलं.
त्यावर बुंदी म्हणाला की हे चुकीचे असून अशी अफवा पसरवणे योग्य नाही. त्यानतंर अजयपालने उत्तर दिलं की नाही, त्या व्यक्तीने म्हटलं होतं की येथे डॉक्टर मोफत उपचार देतील.
आता प्रश्न उपस्थिती होतो की, जर हे सर्व खरं असेल, तर ज्युबिलंट इंग्रेवियाचे अधिकारी स्थानिक लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न का करत आहेत. ते नेमकं काय लपवण्याचा प्रयत्न करत आहेत? झी न्यूज पीडित गावकऱ्यांचा आवाज उठवत राहणार आणि जगासमोर या कारखान्यातील भयाण वास्तव समोर आणणार. लवकरच आम्ही तुम्हाला या ऑपरेशन काला पानी या स्पेशल शोच्या माध्यमातून दाखवू की, कारखान्यातील कामगार स्वतः सांगतात की गावातील आजाराचे मूळ कारखान्यातच आहे.