SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

7 वर्षांमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू, सत्य उघड केलं म्हणून गावकऱ्यांना धमकी?; ZEE MEDIA चे 'ऑपरेशन काला पानी'

झी न्यूजच्या 'ऑपरेशन काला पानी' या शोमध्ये कारखान्यातील व्यवहाराबद्दल कॅमेऱ्यासमोर सत्य सांगितलं म्हणून त्याला कंपनीत बोलवून धमकी देण्यात आली असा त्या व्यक्तीने दावा केला आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 15, 2026, 07:36 AM IST | Updated: Nov 15, 2026, 08:22 AM IST
Image Credit: Operation Kala Pani
Join

झी मीडियाने 'ऑपरेशन काला पानी'मध्ये दाखवले की, उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील ज्युबिलंट इंग्रेवियाच्या गजराउला कारखान्याजवळील रहिवाशांनी त्यांच्या कुटुंबातील मृत्यू आणि आजारपणासाठी रासायनिक कारखान्याला जबाबदार धरलंय. लोकांनी त्यांची ही व्यथा झी न्यूजवर व्यक्त केली. मग काय हे सत्य टीव्हीवर आल्यानंतर कारखान्याच्या अधिकाऱ्यांना कदाचित रुचलं नाही. असं समोर आलं की, एका गावकऱ्याला कारखान्यात बोलावून धमकी देण्यात आली, असा त्या व्यक्तीने दावा केला आहे. धमक्या मिळूनही, तो गावकरी म्हणतो की तो सत्य बोलणे थांबवणार नाही, असं सांगत तो आपल्या भूमिकेवर ठाम आहे. अशात झी न्यूजही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांचा आवाज मोठा करण्यास मागेपुढे पाहणार नाही.

कारखान्याचं भयान वास्तव सांगितलं म्हणून...

ज्युबिलंट इंग्रेविया कारखान्यातील प्रदूषणाबाबत झी मीडियावरील एका बातमीतून कारखान्यातील भयान वास्तव जगासमोर आणलं. त्यानंतर या कारखान्याचे मालक आणि त्यांचं अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. झी मीडियावरील या शोमध्ये ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मांडली आणि  तेव्हा कारखान्याचे अधिकारी नाराज झालं. कारण त्यामुळे कारखान्याचे भयान वास्तव अख्ख्या जगासमोर आलं. त्यानंतर टीव्हीवर सत्य सांगणाऱ्या ग्रामस्थांना कारखान्यांमधील अधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावं लागतंय. असा आरोप आहे की, कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी एका गावकऱ्याला गंभीर स्वरुपात धमकीही दिली.

कारखान्याचे अधिकाऱ्यांकडून आरोपाचे खंडन

झी मीडियाच्या प्रतिनिधीने गजराउला इथल्या ज्युबिलंट इंग्रेवियाचे सीएसआर अधिकारी बुंदी यांना फोनवर या धमकीबद्दल विचारणी केली. त्यांना विचारण्यात आलं की, त्यांनी त्या गावकऱ्याला धमकी दिली होती का?  त्यावर बुंदी यांनी उलट आमच्या प्रतिनिधीला विचारलं की, कोणाला धमकी देण्यात आली होती आणि हा आरोप कोणी केला?

त्यावेळी आमच्या प्रतिनिधीने त्या अधिकाऱ्याला सांगितलं की, पीडित अजयपाल या व्यक्तीने हा आरोप केला आहे. यानंतर त्यालाही या फोनवरील संवादात सहभागी करण्यात आलं.  अजयपालने सांगितलं की, एका डॉक्टरने किंवा तो नक्की कोण होता हे त्याला माहीत नव्हतं, त्याला विचारलं होतं की त्याने असे विधान का केलं.

त्यावर बुंदी म्हणाला की हे चुकीचे असून अशी अफवा पसरवणे योग्य नाही. त्यानतंर अजयपालने उत्तर दिलं की नाही, त्या व्यक्तीने म्हटलं होतं की येथे डॉक्टर मोफत उपचार देतील.

आता प्रश्न उपस्थिती होतो की, जर हे सर्व खरं असेल, तर ज्युबिलंट इंग्रेवियाचे अधिकारी स्थानिक लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न का करत आहेत. ते नेमकं काय लपवण्याचा प्रयत्न करत आहेत? झी न्यूज पीडित गावकऱ्यांचा आवाज उठवत राहणार आणि जगासमोर या कारखान्यातील भयाण वास्तव समोर आणणार.   लवकरच आम्ही तुम्हाला या ऑपरेशन काला पानी या स्पेशल शोच्या माध्यमातून दाखवू की, कारखान्यातील कामगार स्वतः सांगतात की गावातील आजाराचे मूळ कारखान्यातच आहे.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES