SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'तुमची संसदेतली भाषणं आम्ही ऐकतो, तुमच्या शब्दप्रयोगात...'; सुप्रीम कोर्टानं अवमान प्रकरणी संजय राऊतांना नेमकं काय सांगितलं?

शिवसेना यूबीटी नेते संजय राऊत यांनी अवमान प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात हजर झाले आहेत. यावेळी कोर्टाने चांगला माफीनामा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 17, 2026, 15:17 IST | Updated: Nov 17, 2026, 15:19 IST
Image Credit: apology must come from the heart court observed over sanjay raut alligation of criminal contempt case
Join

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या न्यायालयीन अवमान प्रकरणावर आज सुनावणी झाली. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती विपुल पंचोली यांच्या खंडपीठासमोरील झालेल्या सुनावणीत संजय राऊत हे प्रत्यक्ष उपस्थित होते. यावेळी कोर्टाने माफी हृदयातून मागितली जावी, मेंदूतून नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे.

सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायव्यवस्थेबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात न्यायालयीन अवमान  प्रकरण सुरू आहे. यावेळी संजय राऊत स्वतः कोर्टासमोर हजर होते. सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर याचिकाकर्त्याचे वकीलांनी युक्तीवाद करताना म्हटलं की, 'संजय राऊत यांनी सुप्रीम कोर्टाविषयी अवमानकारक वक्तव्य केले आहे. अल्बेनियाचे सुप्रीम कोर्ट जाळल्याचे ट्विट देखील राऊत यांनी केली होते. संजय राऊत जबाबदार व्यक्ती आहेत , त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही.'

याचिकाकर्त्यांनी बाजू मांडल्यानंतर संजय राऊत यांनी बिनशर्त माफी मागितली असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी कोर्टाला दिली. मात्र त्यावर कोर्टाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. 'संजय राऊत तुम्ही वरिष्ठ राजकीय नेते आहेत, आम्ही तुमचे संसदेतील भाषणं आम्ही ऐकतो'. असं म्हणत, 'माफी हृदयातून मागितली जावी, मेंदूतून नाही. तुमच्याकडून जबाबदार वागणूक अपेक्षित आहे. तुमच्या शब्दप्रयोगात किती संयम आवश्यक आहे, हे तुम्हाला माहीत असायला हवे. यात अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करणे उचित ठरेल,' असं न्यायमूर्ती अरविंद कुमार यांनी म्हटलं आहे.

तसंच, सर्वोच्च न्यायालयाने संजय राऊत यांना अधिक चांगला माफीनामा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीसाठी व्यक्तिशः हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

संजय राऊत यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ट्विट बाबत काही उल्लेख केला नाही. ते नेहमीच न्यायालयाबाबतीत असे बोलतात, लिहितात, असं याचिकाकर्त्यांच्या वतीने सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप राय यांनी कोर्टाला सांगितले होते. सरन्यायाधीशांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल संजय राऊत यांनी माफी मागितली होती, परंतु त्या ट्विटनंतरही त्यांनी न्यायालयाविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी करणे सुरूच ठेवले, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES