SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भाजपाला रोखण्यासाठी सर्वात मोठी युती! थेट ओवेसींच्या MIM सोबत हातमिळवणी, सर्व जागा लढवण्याचा निर्णय

भाजपाला रोखण्याच्या हेतूने देशात आणखी एक मोठी युती झाली आहे. असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम (AIMIM) आणि चंद्रशेखर आझाद यांचा आझाद समाज पक्ष यांनी आगामी 2027 उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातमिळवणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी अधिकृत घोषणा केली आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 12, 2026, 14:56 IST | Updated: Nov 12, 2026, 15:48 IST
Image Credit: भाजपाला रोखण्याच्या हेतूने देशात आणखी एक मोठी युती
Join

भाजपाला रोखण्याच्या हेतूने देशात आणखी एक मोठी युती झाली आहे. असदुद्दीन ओवेसी आणि चंद्रशेखर आझाद यांनी राजकीय आघाडीची घोणषा केली आहे. आगामी 2027 उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपण एकत्र येत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. असदुद्दीन ओवेसी यांचा 'ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन' (AIMIM) आणि चंद्रशेखर आझाद यांचा 'आझाद समाज पार्टी (कांशीराम)' या दोन्ही पक्षांनी 'सामाजिक परिवर्तन मोर्चा' नावाची आघाडी स्थापन केली आहे. ही आघाडी राज्यातील सर्व 403 विधानसभा जागांवर निवडणूक लढणार आहे. या आघाडीत चंद्रशेखर आझाद हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील.

लखनऊमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेत दोन्ही नेत्यांनी युतीची घोषणा केली. ओवेसी म्हणाले की, नवीन आघाडी भाजपाला सलग तिसऱ्यांदा सत्तेत परत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करेल. तसंच ही एक मजबूत आघाडी असल्याचं त्यांनी एक उत्तम राजकीय पर्याय असल्याचं म्हटलं आहे. दलित, अल्पसंख्याक, मागास समुदाय आणि इतर उपेक्षित घटकांशी संबंधित समस्यांवर आपण लक्ष केंद्रीत करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

भाजपला तिसऱ्यांदा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये हा एक मजबूत पर्याय असेल, असे मी आत्मविश्वासाने सांगू शकतो, असं ओवेसी म्हणाले. त्यांनी आझाद यांना युतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित करताना म्हटले आहे की, "आमचा भाऊ चंद्रशेखर आझाद हे एसपीएमचे प्रमुख अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील हे जाहीर करताना मला आनंद होत आहे."

ओवेसी यांनी राजकीय पक्षांवर असा आरोप केला की, ते मागासवर्गीय, दलित आणि इतर शोषित घटकांना केवळ व्होट बँक म्हणून पाहतात. ही आघाडी शिक्षणाची खालावलेली स्थिती, राज्यातील तरुणांमधील बेरोजगारी आणि शेतकऱ्यांसमोरील समस्या यांसारखे प्रश्न उपस्थित करेल असं त्यांनी म्हटलं आहे.

"आम्ही भविष्यासाठी राजकारण करू. आम्हाला आशा आहे की उत्तर प्रदेशातील जनता एक उत्तम भविष्य घडवण्यासाठी चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत येईल," असे सांगताना त्यांनी या युतीचे यश म्हणजे राज्यातील जनतेचेच यश असेल असं म्हटलं.

उत्तर प्रदेशात 'एसपीएम' (SPM) ला तिसरा राजकीय पर्याय म्हणून सादर केले जात असताना आझाद म्हणाले की, हा केवळ निवडणुकीचा आणखी एक पर्याय नसून सामाजिक परिवर्तनासाठीचे एक व्यासपीठ आहे.
 

403 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा

चंद्रशेखर आझाद यांनी सांगितले की, त्यांची आघाडी केवळ 100 किंवा 150 जागांवर नव्हे, तर उत्तर प्रदेशातील सर्व 403 विधानसभा मतदारसंघांत निवडणूक लढवेल. त्यांनी नमूद केले की, 2014 पासून भाजपला सत्तेतून हटवण्याबाबत चर्चा सुरू आहे, परंतु तसे अद्याप घडलेले नाही.

ते म्हणाले, "भाजपला सत्तेतून मुळासकट उखडून टाकण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आम्ही 2014 पासून 2024 पर्यंत वाट पाहिली, पण भाजप सत्तेतून बाहेर गेला नाही; उलट, तो अधिक शक्तिशाली झाला आहे. दलित आणि उपेक्षित समाज, ज्यांना दीर्घकाळ अपमान सहन करावा लागला आहे, त्यांना आता अशा प्रकारचा अपमान सहन करण्याची गरज नाही."
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES