SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

अवघ्या ₹4.99 लाखांची कार ठरली भारतातील Most Sold Car; 23747 युनिट्सची 30 दिवसात विक्री

देशात सर्वाधिक विक्री झालेल्या अव्वल चार कार्सची संख्या थक्क करणारी आहे. त्याही सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली आणि सर्वात जास्त विक्री झालेली कार कोणती ठरली हे जाणून घेऊयात आकडेवारीसहीत...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 09, 2026, 13:35 IST | Updated: Nov 09, 2026, 13:59 IST
Image Credit: ऑक्टोबरमध्ये ठरली पहिल्या पसंतीची कार (फोटो: संबंधित कंपनीच्या वेबसाईटवरुन साभार)
Join

तुम्ही कार घेण्याचा विचार करत आहात का? बजेटमध्ये आणि छोट्या कुटुंबासाठी उत्तम कारच्या शोधात तुम्ही असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुमच्याप्रमाणेच स्वस्तात मस्त आणि तितकीच सुरक्षित कार घेण्याच्या विचारात असलेल्या भारतीयांनी ऑक्टोबर महिन्यात कोणत्या कारला सर्वाधिक पसंती दिली आहे याची आकडेवारी समोर आली आहे. म्हणजेच भारतात ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक विकली गेलेली कार कोणती हे नुकत्याच जारी करण्यात आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे ही कार अवघ्या 4.99 लाखांना उपलब्ध आहे.

सर्वाधिक विक्रीच्या कारचे किती युनिट विकले गेले?

ऑक्टोबर महिन्यामध्ये भारतात सर्वाधिक विक्री झालेल्या कारचे 23 हजार 747 युनिट्स विकले गेले आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर 2025 मध्ये याच कारचे 18970 युनिट्स विकले गेले होते. म्हणजेच या कारची विक्री मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 25.2 टक्क्यांनी वाढली आहे. या कारवर ग्राहकांच्या अगदी उड्या पडल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

पहिल्या पसंतीची कार कोणती

या परवडणाऱ्या, छोट्या आणि सुरक्षित कार्सची मोठी मागणी आहे. या मागणीला सणासुदीच्या काळातील ऑफर्स, विशेष कर्जविषयक योजना आणि इतर गोष्टींचं पाठबळ मिळाल्याने नवरात्री, दसरा, दिवाळीमध्ये छोट्या कार्सची जबरदस्त विक्री झाली. सर्वाधिक विकल्या गेलेल्या छोट्या कार्सच्या यादीत 23 हजार 747 युनिट्ससहीत मारूतीची वॅगनआर कार पहिल्या पसंतीची कार ठरली आहे. वॅगनआरने 22 हजार 436 युनिट्स विकल्या गेलेल्या मारुती ब्रेझा आणि 21 हजार 966 युनिट विक्री झालेल्या टाटा नेक्सॉन सारख्या लोकप्रिय कार्सला मागे टाकत देशातील सर्वात लोकप्रिय कार होण्याचा मान ऑक्टोबर महिन्यात मिळवला आहे.

सर्वाधिक विक्री झालेल्या कारला पसंती का?

अवघ्या 4.99 लाखांपासून सुरु होणारी रेंज, पेट्रोल आणि सीएनजी पर्यायसहीत उत्तम मायलेज आणि तुलनेनं कमी मेंटेनन्स यासारख्या गोष्टींमुळे ही हॅचबॅक कार भारतीयांच्या पसंतीस उतरल्याचं पाहायला मिळत आहे. 

या कारची मागणी 86 टक्क्यांनी वाढली

अव्वल चार विक्री झालेल्या कार्सच्या यादीत मारुती बलेनो ही चौथ्या स्थानी असून यंदाच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 20 हजार 919 ग्राहकांनी ही कार विकत घेतली. मागील वर्षीच्या तुलनेत या कारची मागणी 24 टक्क्यांनी वाढली आहे. 2025 मध्ये याच महिन्यात 16 हजार 873 बलेनो कार विकल्या गेलेल्या. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या टाटा नेक्सॉनच्या मागणीमध्ये एक टक्क्यांनी घट झाली असून या वर्षाच्या तुलनेत मागील वर्षी नेक्सॉनचे अधिक युनिट्स विकले गेले होते. 2025 मधील 22 हजार 83 कारच्या तुलनेत यंदाच्या वर्षी 20966 नेक्सॉन विकल्या गेल्या आहेत. सर्वाधिक विक्री झालेल्या कार्समध्ये तब्बल 86 टक्के मागणी वाढलेली कार ठरली आहे मारुतीची ब्रेझा! मागील वर्षी अवघे 12 हजार 72 युनिट्स विक्री झालेल्या या कारचे ऑक्टोबर 2026 मध्ये 22 हजार 436 युनिट्स विकले गेले. अव्वल क्रमांकावर असलेल्या मारुती वॅगनआरचे मागील वर्षी 18 हजार 970 युनिट्स विकले गेले होते.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES