• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /सख्ख्या भावाकडून दोन वर्षे बळजबरी फायदा उचलला; आई-वडिलांना विश्वास बसेना म्हणून मुलीने...; हादरवणारा प्रकार!

सख्ख्या भावाकडून दोन वर्षे बळजबरी फायदा उचलला; आई-वडिलांना विश्वास बसेना म्हणून मुलीने...; हादरवणारा प्रकार!

उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये नर्सिंग विद्यार्थिनीने सख्ख्या भावावर दोन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला. पेन कॅमेऱ्यात पुरावे गोळा केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 29, 2026, 16:14 IST|Updated: Nov 29, 2026, 16:29 IST
joinshare
सख्ख्या भावाकडून दोन वर्षे बळजबरी फायदा उचलला; आई-वडिलांना विश्वास बसेना म्हणून मुलीने...; हादरवणारा प्रकार!
Image Credit: बहिणीवर अत्याचार

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

2

आपले पैसे वाचवून ठेवा,पुढच्या काळात मोठे आव्हान उभे ठाकणार; खुद्द अर्थ मंत्रालयाचे संकेत;सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार?

3

50 वर्षांची कट्टर राजकीय मैत्री भाजपने 24 तासात तोडली? इंडिया आघाडीला पहिला सर्वात मोठा धक्का! MK स्टॅलिन असं का म्हणाले पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही

4

सुपरमॅन प्रमाणे लगावली उडी, यशस्वी जयस्वालने एका हाताने पकडला जबरदस्त कॅच

5

6 खासदारांवर दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिदेंच गटाचे उत्तर; उर्वरीत 3 खासदारांबाबत खळबळजनक दावा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

ज्या भावाकडून संरक्षणाची अपेक्षा होती, त्याच भावाकडून दोन वर्षे लैंगिक अत्याचार सहन करावे लागल्याचा गंभीर आरोप एका नर्सिंग विद्यार्थिनीने केलाय. उत्तर प्रदेशातील बरेली येथे ही घटना घडलीय. सुरुवातीला कुटुंबीयांनी तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर विद्यार्थिनीने स्पाय पेन कॅमेऱ्याच्या मदतीने पुरावे गोळा केले. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर आरोपी भावाला अटक केली. या घटनेमुळे कौटुंबिक सुरक्षिततेचा आणि पीडितेला मदत न मिळण्याचा गंभीर प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय.

शिक्षणासाठी बरेलीत राहायला आली

पीडित विद्यार्थिनी मूळची उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातील दातागंज परिसरातील आहे. 2022 मध्ये तिने बरेली येथील महाविद्यालयात जनरल नर्सिंग अँड मिडवाइफरी (GNM) अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. शिक्षणासाठी ती बरेलीतील बारादरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाड्याच्या घरात राहत होती. तिचा मोठा भाऊही त्याच घरात राहत होता.

दोन वर्षे अत्याचार केल्याचा भावावर आरोप

विद्यार्थिनीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा भाऊ गेल्या दोन वर्षांपासून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत होता. तिने विरोध केला किंवा कोणाला सांगण्याचा प्रयत्न केला, तर तो आत्महत्या करण्याची धमकी देत असे. कुटुंबाची बदनामी होईल, या भीतीमुळेही ती बराच काळ शांत राहिली. तिने आई-वडिलांना या प्रकाराची माहिती दिली होती; मात्र त्यांनी सुरुवातीला तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नसल्याचा आरोप आहे.

पेन कॅमेऱ्यामुळे प्रकरण उघडकीस

आपल्यासोबत घडणारा प्रकार सिद्ध करण्यासाठी विद्यार्थिनीने खोलीत गुप्त पेन कॅमेरा लावला. 17 सप्टेंबर रोजी घडलेल्या कथित प्रकाराचे व्हिडीओ शूटींग झाले. त्यानंतर तिने हा व्हिडीओ आईला दाखवला. मात्र, कुटुंबाची बदनामी होण्याच्या भीतीने तिला तक्रार न करण्याचा सल्ला देण्यात आल्याचा आरोप आहे.

घरातच नजरकैदेत ठेवल्याचा आरोप

व्हिडीओ दाखवल्यानंतर कुटुंबीयांनी विद्यार्थिनीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. तिला गावातील घरातच थांबवून ठेवण्यात आले आणि पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयात जाण्यासही विरोध करण्यात आल्याचा आरोप तिने केला. त्यानंतर तिने बरेलीतील सामाजिक कार्यकर्त्या साक्षी मिश्रा यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली. त्यांच्या मदतीने पोलिसांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला.

पोलिसांकडून पुढील तपास

सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने विद्यार्थिनीने बारादरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवून आरोपी भावाला अटक केली आहे. या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांत पीडितेची ओळख गोपनीय ठेवणे कायद्याने आवश्यक आहे. त्यानुसार पीडितेची ओळख गुप्त ठेवण्यात आलीय.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
crime