SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भारतातील सर्वात पावरफुल मुख्यमंत्री मोठ्या संकटात! 25 आमदारांचा सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा? 14 दिवसांत काहीही होऊ शकते?

25 आमदारांनी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या विरोधात वेगळा गट स्थापन केल्या आहेत. काही मागण्या या आमदारांनी मांडल्या आहेत. यासाठी 14 दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. जम्मू आणि काश्मीरचे सरकार अडचणीत आले आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 02, 2026, 09:22 PM IST | Updated: Nov 02, 2026, 09:28 PM IST
Join

जम्मू आणि काश्मीर : जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठा राजकीय भूकंप आला आहे. भारतातील सर्वात पावरफुल मुख्यमंत्र्यांपैकी एक असलेले जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री  ओमर अब्दुल्ला मोठ्या संकटात सापडले आहेत.  ओमर अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या 25 आमदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे. हे 25 आमदार ओमर अब्दुल्ला यांच्या विरोधता एकवटले आहेत. या आमदारांनी 14 दिवसांचा अल्टीमेटम दिले आहे. यामुळे  जम्मू आणि काश्मीरमधील ओमर अब्दुल्ला सरकार संकटात सापडले असल्याचा दावा केला जात आहे. 

ओमर अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सच्या (एनसी) 25 बंडखोर आमदारांनी आपला एक गट स्थापन केला आहे.  या गटाने पक्षाच्या ओमर अब्दुल्ला यांना 14 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. मंत्रीमंडळ विस्तारांनंतर हे आमदार नाराज झाले आहेत.  आमदारांनी सरकारमध्ये मोठ्या बदलांची मागणी केली आहे.   मागण्या पूर्ण न झाल्यास राजभवनात जाऊन सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेण्याचा इशारा या गटाने दिला आहे.

25 आमदारांनी वेगळा गट का स्थापन केला?

नुकताच जम्मू काश्मिरमधील ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारचा मंत्री मंडळ विस्तार पार पडला. या मंत्रीमंडळ विस्तानंतरच वादाची ठिणगी पडली आहे.  सर्व विद्यमान मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांच्या सल्लागाराला त्यांच्या पदांवरून तात्काळ हटवण्याची मागणी या 25 आमदारांनी केली आहे. संपूर्ण विधिमंडळ पक्षाशी चर्चा करून पूर्णपणे नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्याची मागणी या आमदारांनी केली आहे. मंत्र्यांची निवड पारदर्शकपणे व्हावे अशी देखील या गटाची मागणी आहे.  नवीन मंत्रिमंडळ स्थापन करताना संपूर्ण विधानसभेचा सल्ला घेतला जावा. गुणवत्तेच्या आधारावर जबाबदाऱ्या सोपवल्या जाव्यात, अशी त्यांची मागणी आहे.

कलम 370 आणि 35 अ बाबत आमदारांवर  दबाव?

सरकारने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने ठामपणे पाळावीत. यामध्ये विशेषतः कलम 370, 35अ आणि इतर घटनात्मक सुरक्षा तरतुदींची पूर्ण पुनर्स्थापना करण्याचा मुद्दा केंद्र सरकारकडे जोरदारपणे मांडावा अशी प्रमुख मागणी या 25 आमदारांच्या गटाची आहे. 14 दिवसांची मुदत या गटाने दिली आहे. मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर  राजभवनावर मोर्चा काढून ओमर अब्दुल्ला सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतल्याची घोषणा करू शकतो अशा इशारा या गटाने दिल्याची नाहिती सुत्रांनी दिली.

25 आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यास काय होईल?

जम्मू आणि काश्मीर विधानसभेत एकूण 91 सदस्य आहेत.  नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) 41 आमदार आहेत. जर 25 आमदारांनी एकत्र येऊन पाठिंबा काढून घेतला तर सरकार अडचणीत येवू शकते.  ओमर अब्दुल्ला सरकारला पुन्हा बहुमत सिद्ध करावे लागू शकते. ज्यामुळे सरकारचे कामकाज चालवणे कठीण होईल. ओमर अब्दुल्ला यांना आता 14 दिवसांच्या आत नाराज आमदारांची समजूत काढावी लागणार आहे. यात ते अपयशी ठरल्यास त्यांचे सरकार धोक्यात येऊ शकते.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES