SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

एकाच पक्षाच्या 12 पैकी 11 आमदारांनी रातोरात पक्ष बदलला; 1 आमदारामुळे BJP ला जॅकपॉट लागला? भारतात सर्वात मोठा राजकीय भूकंप!

मेघालयमध्ये मोठा राजकीय भूकंप आला आहे. युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीच्या 12 पैकी 11 आमदारांनी रातोरात पक्ष बदलला आहे. या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे भाजप पक्षाला लॉटरी लागली आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 06, 2026, 08:07 PM IST | Updated: Nov 06, 2026, 08:08 PM IST
Join

मेघालय : दिवाळीआधी भारतात मोठा राजकीय भूकंप आला आहे.  मेघालय राज्याच्या राजकारणात प्रचंड मोठी उलथापालथ झाली आहे. युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी (यूडीपी) या प्रादेशिक पक्षाच्या 12 पैकी 11 आमदारांनी रातोरात पक्ष बदलला आहे. अचानक 11 आमदार फुटल्याने मेघालयचे राजकीय गणित बिघडले आहे.  सरकारच धोक्यात आले आहे.   

यूडीपीच्या 11 आमदारांनी पक्ष सोडला आहे.  या बंडखोर आमदारांपैकी 8 जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर 3 जण मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) मध्ये सामील झाले आहेत. या मोठ्या पक्षांतरामुळे विधानसभेत यूडीपीचे केवळ एकच आमदार राहिला आहे. मेटबाह लिंगडोह असे या आमदाराचे नाव आहे. ते पक्षाध्यक्ष आहेत.  

आमदारांच्या बंडखोरीमुळे पक्षात उभी फूट पडली आहे. राजकीय परिस्थिती पाहता, यूडीपी अध्यक्ष मेटबाह लिंगडोह यांनी मेघालय मंत्रिमंडळातील आपल्या मंत्रीपदाचा स्वेच्छेने राजीनामा दिला आहे. मेघालय हे  ख्रिस्ती-बहुल राज आहे. मेघालयमध्ये आलेल्या या सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाचा सर्वाधिक राजकीय फायदा कोणाला होणार याची जोरदार चर्चा रंगली आहे. 

12 पैकी 11 आमदारांनी रातोरात पक्ष का बदलला?

पक्ष नेतृत्वामुळे मेघालयच्या युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीत मोठा राजकीय भूकंप आला आहे. यूडीपी आमदार नेतृत्व आणि संघटनेबाबत असंतोष निर्माण झाला होता.  सप्टेंबर 2025 मध्ये मंत्रिमंडळात फेरबदल झाले होते.  पक्षाचे ज्येष्ठ नेते पॉल लिंगडोह आणि किर्मेन शिला यांच्या जागी मेटबाह लिंगडोह आणि लखमेन रिम्बुई यांची मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळे आमदारांमध्ये पक्षात नाराजी पसरली.

आमदारांनी भाजप पक्षात प्रवेश का केला?

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या आमदारांनी काही मागण्या केल्या आहेत. संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये खासी भाषेचा समावेश करावा अशी प्रमुख मागणी आहे. कोळसा खाणकामाचा मुद्दा देखील उपसस्थित केला आहे. राज्यात बाहेरील लोकांच्या प्रवेश तसेच इतर प्रश्नांचा समावेश आहे. भाजपमध्ये सामील झालेल्या आमदारांना पक्षाच्या नेतृत्वाकडून हे मुद्दे सोडवण्याचे आश्वासन मिळाल्याचे वृत्त आहे.

मेघालयमधील सर्वात मोठा पक्ष

यूडीपी हा  मेघालयाच्या राजकारणातील एक प्रमुख प्रादेशिक पक्ष आहे. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाने 12 जागा जिंकल्या. मात्र, 3 वर्षात पक्षात मोठी फूट पडली. यूडीपीचे आठ आमदार भाजपमध्ये तर तीन आमदार एनपीपीमध्ये सामील झाले. मेटबाह लिंगडोह हे एकमेव आमदार राहिले आहेत. ते पक्षाचे अध्यक्ष आहेत. या घडामोडीनंतर 31 ऑक्टोबर रोजी लिंगडोह यांनी कॉनरॅड संगमा सरकारमधील मंत्रीपदाचा राजीनामा दिला. 11 आमदारांनी पक्ष सोडल्याने  मंत्री म्हणून काम करणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. 

यूडीपीच्या निर्णयाचा भाजपलाच फायदा होणार? 

यूडीपी पक्षाच उभी फूट पडली असली तरी कॉनरॅड संगमा यांच्या सरकारवर याचा परिणाम झालेला नाही. मेघालय विधानसभेत 60 सदस्य आहेचय  सत्ताधारी एनपीपीचेच 36 आमदार आहेत, तर भाजप देखील सत्तेत आहे. 8 नवीन आमदारांच्या प्रवेशामुळे भाजपला लॉटरी लागली आहे. भाजपच्या आमदारांची संख्या 10 वर पोहचली झाली आहे.  एनडीए/एमडीए आघाडीने 31 बहुमताचा आकडा सहजपणे ओलांडला आहे. एकंदरीत, या संपूर्ण राजकीय नाटकात जर कोणाला सर्वात मोठी लॉटरी लागली असेल, तर ती भाजपला लागली आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES