SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

Maharashtra Weather Tomorrow Udyache Havaman ( 16 नोव्हेंबर 2026 उद्याचे हवामान ): भारतातील 12 राज्यांना हवामान विभागने अलर्ट जारी केला आहे. बंगलाच्या उपसागरात वादळ सक्रिय झाले आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 15, 2026, 10:58 PM IST | Updated: Nov 15, 2026, 11:01 PM IST
Join

16 नोव्हेंबर 2026 उद्याचे हवामान : आग्नेय बंगालच्या उपसागरात 13 नोव्हेंबरपासून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.  याची तीव्रता वाढून तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. पश्चिम-वायव्य दिशेकडे सरकताना या क्षेत्राची तीव्रता आणखी वाढणार आहे. 16 नोव्हेंबरला त्याचे 'अक्वान' चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. या वादळामुळे भारताच्या हवामानात लक्षणीय बदल झाला आहे.  12 राज्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. 145 स्पीडने वारे वाहण्याची शक्यता आहे. 

मागील 20 दिवसांत बंगालच्या उपसागरात तयार झालेले हे तिसरे चक्रीवादळ आहे. कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्यावरच चक्रीवादळ कोणत्या भागात जमिनीवर प्रवेश करू शकेल याविषयी सांगता येईल, असे हवामानशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.  हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार 16 ते 17 नोव्हेंबरपर्यंत त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होईल. हे वादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकणार आहे. परिणामी काही भागांमध्ये ताशी 145 किलोमीटर वेगापर्यंत वारे वाहू शकतात. समुद्रात मोठ्या लाटा उसळू शकतात. किनारट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

मुसळधार पावसाचा अलर्ट

आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीच्या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळ, माहे, तामिळनाडू, पुदुचेरी, कराईकल आणि किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशातील किनारपट्टी भागाला पावसाचा मोठा तडाखा बसू शकतो.  16 नोव्हेंबर रोजी दिल्ली-एनसीआर, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.  ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्येही तुरळक पावसाची शक्यता आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES