बिहार : बिहारच्या हाजीपुरात मोठी दुर्घटना घडली आहे. गंगा नदीत बोट उलटली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. बोटीतून 15 ते 20 लोक प्रवास करत होते. घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे. ही दुर्घटना नेमकी कशी घडली यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
13 ऑक्टोबर रोजी बिहारमधील हाजीपूर येथे गंगा नदीत एक बोट उलटून मोठा अपघात झाला. बोटीत जवळपास 20 हून लोक होते. हा अपघात राघोपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामपूर श्यामचंद गावाजवळ घडला. वैशालीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या अपघातात 11 जणांच्या मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
प्राथमिक माहिती नुसार ही बोट एका मेजवानीसाठी जात होती. काही अंतरावर गेल्यावर गंगा नदीत ही बोट उलटली. सर्वा प्रावसी नदीत बुडू लागले. अनेका पोहता येत नव्हते. घटनेची माहिती मिळताच परिसरात घबराट पसरली. स्थानिक पोलीस आणि प्रशासन तात्काळ घटनास्थळ दाखल झाले. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. 5 जणांना वाचवण्यात यश आले आहे.
पोलिस मृतदेहांची ओळख पटवून मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. घटनास्थळाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. दुर्घटनेनंतर घटनास्थळी आरडा, ओरडा आणि प्रचंड गोंधळ पहायला मिळत आहे. रात्रीची वेळ असल्याने बचाव कार्यात देखील अडथळा येत होता. अपघातानंतर पीडितांना मदत करण्यासाठी स्थानिकांची गर्दी जमली होती. या भीषण दुर्घटनेत, लोक आपल्या प्रियजनांबद्दल माहिती मिळवण्यासाठी धडपडत होते.
गंगा नदीची वाढती पाणी पातळी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने खाजगी बोटींच्या संचालनावर संपूर्ण बंदी घातली होती. असे असूनही, खाजगी बोटी नियमांचे उल्लंघन करून चालवल्या जात होत्या. अपघातानंतर स्थानिक प्रशासनाच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जिल्हा प्रशासनाने बोटींच्या वाहतुकीवर बंदी घातली असतानाही, ही अवैध वाहतूक कशी सुरू होती? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.