• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /MMS मुळे निलंबित झालेल्या अधिकाऱ्याची महिला पोलिसासोबत लग्नगाठ; 'त्या' प्रकरणाला वेगळं वळण!

MMS मुळे निलंबित झालेल्या अधिकाऱ्याची महिला पोलिसासोबत लग्नगाठ; 'त्या' प्रकरणाला वेगळं वळण!

उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणात निलंबित निरीक्षक नीरज तोमर यांचा महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत मंदिरातील व्हिडिओ समोर आहे. यात आपण लग्न केल्याचा दावा त्यांनी केलाय. काय घडलंय नेमकं? जाणून घेऊया.

Reported ByPravin Dabholkar
Published: Oct 24, 2026, 05:03 PM IST|Updated: Oct 24, 2026, 05:20 PM IST
joinshare
MMS मुळे निलंबित झालेल्या अधिकाऱ्याची महिला पोलिसासोबत लग्नगाठ; 'त्या' प्रकरणाला वेगळं वळण!
Image Credit: MMS मुळे निलंबन

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील पोलीस विभागाशी संबंधित एका प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. पोलीस ठाण्याच्या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर झाल्याच्या प्रकरणात निलंबित करण्यात आलेले निरीक्षक नीरज तोमर आता एका महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबतच्या व्हिडिओमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. या व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांना जीवनसाथी मानून एकत्र राहण्याची इच्छा व्यक्त करताना दिसतात. काही कायदेशीर अडचणी दूर झाल्यानंतर विवाहाची औपचारिक प्रक्रिया पूर्ण करण्याचे संकेतही महिला कर्मचाऱ्याने दिले आहेत. काय आहे नेमकं प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील व्हिडिओमुळे प्रकरण चर्चेत

बिजनौर जिल्ह्यातील वाढापूर पोलीस ठाण्याच्या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर झाल्याचे प्रकरण समोर आले होते. हा ग्रुप पोलीस ठाण्याशी संबंधित माहिती आणि कामकाजासाठी वापरला जातो. व्हिडिओ काही वेळाने हटवण्यात आला; मात्र तोपर्यंत काही कर्मचाऱ्यांपर्यंत तो पोहोचला होता. या घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले.

निरीक्षक नीरज तोमर निलंबित

या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर बिजनौरचे पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार बिश्नोई यांनी चौकशीचे आदेश दिले. तपास पथकाने संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले. चौकशी अहवालाच्या आधारे वाढापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी निरीक्षक नीरज तोमर यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्याविरोधात विभागीय कारवाईही सुरू करण्यात आली.

मंदिरातील व्हिडिओमध्ये नेमकं काय?

निलंबनानंतर सोशल मीडियावर समोर आलेल्या नव्या व्हिडिओमध्ये नीरज तोमर आणि एक महिला पोलीस कर्मचारी मंदिराजवळ दिसत आहेत. दोघेही एकमेकांना जीवनसाथी म्हणून स्वीकारल्याचे आणि एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगताना दिसत आहेत. आम्ही एकमेकांना मानसिकदृष्ट्या जीवनसाथी मानल्याचे महिलेने व्हिडीओत सांगितले आहे. काही कायदेशीर अडचणी दूर झाल्यानंतर विवाहाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचा त्यांचा विचार असल्याचेही महिलेने सांगितले.

व्हिडिओ बनावट असल्याचा महिलेचा दावा

नव्या व्हिडिओमध्ये महिला पोलीस कर्मचारी काही लोकांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करते. कथित बनावट व्हिडिओच्या माध्यमातून आपली प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न झाल्याचेही ती सांगते. दोघांनीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनावश्यक हस्तक्षेप करू नये, असे आवाहन केले आहे.

बिजनौर में कुछ दिन पहले अधिकारियों के ग्रुप पर अश्लील वीडियो डालने के मामले में सस्पेंड दरोगा नीरज तोमर ने अब महिला पुलिसकर्मी के साथ शादी कर ली है। शादी के दोनों ने एक वीडियो बनाकर वायरल किया, जिसमें दोनों ने कुछ लोगों पर अनावश्यक परेशान करने का आरोप लगाया। https://t.co/eycyTq2gRL

— Dinesh Rathour Journlist (@DineshRathour8) October 24, 2026

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
india