भाजप खासदाराच्या कारला भीषण अपघात, हात फ्रॅक्चर अन्...; नेमकं काय घडलं?
छत्तीसगडच्या राज्यसभा खासदार आणि भाजप नेत्या लक्ष्मी वर्मा यांच्या कारला अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या हात फ्रॅक्चर झाला आहे.
छत्तीसगडच्या राज्यसभा खासदार आणि भाजप नेत्या लक्ष्मी वर्मा यांच्या कारला अपघात झाला असून या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. शुक्रवारी बलौदाबाजार इथल्या एका कार्यक्रमाला सहभागी झाल्यानंतर रायपूरला परतत असताना बंगोलीजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. यात त्यांच्या हात फ्रॅक्चर झाला आहे. त्यांना उपचारासाठी रायपूरच्या एम्समध्ये दाखल करण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार अपघाताच्या वेळी कारमध्ये लक्ष्मी वर्मा यांच्यासोबत मुलगा, गनमॅन आणि ड्रायव्हर होते. या अपघातात ड्रायव्हर आणि गनमॅन हे किरकोळ जखमी झाली आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री विष्णू देव साई आणि कॅबिनेट मंत्री श्याम बिहारी जयस्वाल यांनी त्यांची विचारपूस केली आहे. विष्णू देव साई यांनी यांनी 'एक्स' (X) वर पोस्ट करत या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलंय.
छत्तीसगडचे कॅबिनेट मंत्री श्याम बिहारी जयस्वाल यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त करत सोशल मीडियावर लिहिलयं की, रायपूर-खरोरा रस्त्यावर झालेल्या रस्ते अपघातात राज्यसभा खासदार लक्ष्मी वर्मा आणि इतर जखमी झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे.
दरम्यान रात्रीची वेळ बंगोलीजवळ कारला समोरून येणाऱ्या दुसऱ्या वाहनाला धडक दिली. तर खरोरा पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत.