• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /शाळेच्या शिक्षकाचं डेटिंग अ‍ॅपवर जुळलं, लग्नासाठी कॅनडाहून भारतात आली महिला;प्रत्यक्षात पाहून मास्तरांना पश्चाताप; काय घडलं?

शाळेच्या शिक्षकाचं डेटिंग अ‍ॅपवर जुळलं, लग्नासाठी कॅनडाहून भारतात आली महिला;प्रत्यक्षात पाहून मास्तरांना पश्चाताप; काय घडलं?

डेटिंग अ‍ॅपवर वर्षभर प्रेमसंबंध आणि लग्नाचे आश्वासन मिळाल्यानंतर 61 वर्षांची कॅनेडियन महिला भारतात आली. मात्र, राजस्थानमध्ये पोहोचल्यानंतर तरुणाने लग्नास नकार दिला. अखेर कॅनडाच्या दूतावासाला आणि पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 15, 2026, 05:40 PM IST|Updated: Nov 15, 2026, 05:48 PM IST
joinshare
शाळेच्या शिक्षकाचं डेटिंग अ‍ॅपवर जुळलं, लग्नासाठी कॅनडाहून भारतात आली महिला;प्रत्यक्षात पाहून मास्तरांना पश्चाताप; काय घडलं?
Image Credit: मास्तरांचं कॅनडियन महिलेवर प्रेम

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

ऑनलाइन डेटिंग अ‍ॅपवर सुरू झालेल्या ओळखीचे रूपांतर लग्नाच्या निर्णयात झाले. याच विश्वासाने कॅनडातील 61 वर्षीय महिला भारतात आली. हरियाणातील पानिपत येथील नितीन नावाच्या तरुणासोबत तिची जवळपास वर्षभरापासून डेटिंग अ‍ॅपवरून ओळख होती. सुरुवातीच्या संवादानंतर दोघे सोशल मीडियावरही संपर्कात आले. हळूहळू त्यांच्यात जवळीक वाढली आणि दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. या निर्णयानंतर महिला 11 नोव्हेंबर 2026 रोजी टुरिस्ट व्हिसावर दिल्ली विमानतळावर दाखल झाली. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.

दिल्ली विमानतळावर आणायला गेला

महिला दिल्लीला पोहोचल्यानंतर नितीन स्वतः तिला घेण्यासाठी विमानतळावर गेला. तेथून तो तिला राजस्थानमधील कोटपूतली-बहरोड जिल्ह्यातील नीमराना येथील बीबी बिल्डर्स सोसायटीमध्ये घेऊन आला. येथे त्याच्या मावसा-मावशीचे फ्लॅट असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघे जवळपास दोन दिवस या ठिकाणी एकत्र राहिले. लग्नाबाबत पुढील चर्चा सुरू असतानाच दोघांमधील नात्यात तणाव निर्माण झाला. ऑनलाइन संवादातून तयार झालेल्या नात्याची प्रत्यक्ष भेटीनंतर वेगळीच परिस्थिती निर्माण झाली होती.

महिलेचे वय समजताच तरुणाला पश्चाताप

लग्नाची चर्चा पुढे जात असताना महिलेला सुमारे 61 वर्षे असल्याचे समोर आले. त्यानंतर नितीनने वयातील अंतराचा मुद्दा उपस्थित करत लग्न करण्यास नकार दिला. नितीनचे वय 31 वर्षे असून दोघांच्या वयात जवळपास 30 वर्षांचे अंतर असल्याने या निर्णयामुळे दोघांमध्ये वाद झाला. वर्षभर ऑनलाइन संवाद साधल्यानंतर लग्नाच्या अपेक्षेने भारतात आलेल्या महिलेसाठी हा मोठा धक्का होता.

कॅनडाच्या दूतावासाकडून पोलिसांना माहिती

13 नोव्हेंबर रोजी महिलेने कॅनडाच्या दूतावासाशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. दूतावासाकडून स्थानिक पोलिसांना याबाबत कळवण्यात आले. त्यानंतर 14 नोव्हेंबरला पहाटे सुमारे चार वाजता नीमराना पोलीस बीबी बिल्डर्स सोसायटीमध्ये पोहोचले. पोलिसांनी दोघांनाही पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. नितीनला शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

महिलेला कॅनडाला पाठवण्याची तयारी

या घटनेनंतर कॅनडाच्या महिलेला कोटपूतली येथील कोर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. तिच्या सुरक्षिततेसाठी आणि मायदेशी परत पाठवण्यासाठी पोलीस, प्रशासन आणि कॅनडाचे दूतावास यांच्यात समन्वय सुरू आहे. नितीन हा पानिपतचा रहिवासी असून खासगी शाळेत शिक्षक म्हणून काम करत असल्याची माहिती नीमराना पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News