SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

40 हजारांचं औषध 3 हजारात... आजपासून 1031 औषधांच्या नव्या किंमती लागू; सर्वसामान्यांचे ₹3502 कोटी वाचणार

सर्व औषध विक्रेते, हॉस्पिटल्स आणि वैद्यकीय संस्थांना त्यांच्या आवारात तसेच वेबसाईट्सवर या औषधांची नवीन सुधारित किंमत यादी म्हणजेच नव्या एमआरपीचे दर ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक आहे.

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 09, 2026, 08:54 AM IST | Updated: Nov 09, 2026, 09:12 AM IST
Image Credit: ग्राहकांना सर्वात मोठा दिलासा (प्रातिनिधिक फोटो सौजन्य पीटीआय आणि 'रॉयटर्स'वरुन साभार)
Join

भारत सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (एनपीपीए) एक मोठा निर्णय घेतला असून त्याचा कोट्यवधि रुग्णांना फायदा होणार आहे. 'एनपीपीए'ने कॅन्सरवरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या 137 औषघांच्या किंमती कमी केल्या आहेत. हा निर्णय आज म्हणजेच 9 ऑक्टोबरपासून लागू झाला आहे. या नव्या निर्णयामुळे 40 हजार रूपयांचे औषध 3 हजारांमध्ये मिळणार आहे. हा निर्णय कॅन्सर रुग्णांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी दिलासा देणारा असून या निर्णयामुळे कॅन्सरवरील उपचार स्वस्त होणार आहेत.

समितीने केली शिफारस

कॅन्सरच्या औषधांच्या किमतीविषयी अभ्यास करण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत आरोग्य सेवा महासंचालनालयाने तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. या समितीच्या शिफारशींनुसार 'एनपीपीए'ने औषधांच्या किमतींवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला. 

कंपन्यांनी सरकारला दिली माहिती

कॅन्सरच्या औषध विक्रीवर विक्रेते आणि वितरकांना मिळणाऱ्या नफ्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. औषध वितरक आणि रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी नफ्याला आळा घालण्यासाठी सरकारने 'ट्रेड मार्जिन' कमाल 30 टक्क्यांवर मर्यादित केले आहे. त्यामुळे औषधांच्या किंमती 96 टक्क्यांपर्यंत कमी झाल्या आहेत. आतापर्यंत 76 औषध कंपन्यांनी 121 प्रकाराच्या कर्करोगावरील औषधांच्या 1225 घटकांच्या एमआरपीमध्ये घट केली असून याची माहिती सरकारला दिली आहे. यापैकी 1031 औषधांच्या किंमती कमी झाल्या आहेत.

600 ब्रँडच्या औषधांच्या किमतीत 50 टक्क्यांपेक्षा जास्त घट

तब्बल 600 ब्रँडच्या औषधांच्या किमतीत 50 टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली आहे. काही औषधांच्या किमतीत तर तब्बल 96.45 टक्क्यांपर्यंत कपात झाली आहे. ही औषधे स्तन (ब्रेस्ट कॅन्सर), प्रोस्टेट (प्रोस्टेट कॅन्सर), फुफ्फुस (लंग कॅन्सर), कोलोन आणि गर्भाशयाच्या कॅन्सरसह 20 हून अधिक प्रकारच्या कॅन्सर उपचारात वापरली जातात.

कोणत्या औषधांच्या किंमतींमध्ये किती घट?

पॅल्बोप्रो (Palbopro) या स्तनाचा कॅन्सरच्या औषधाच्या 21 कॅप्स्युल्स आधी 40 हजार 421 रुपयांना मिळायच्या आता त्यांची किंमत 2 हजार 720 इतकी झाली आहे. तर प्रोस्टेट कॅन्सरवरील Abirone  टॅबलेटची किंमत ₹41250 वरून ₹3218 इतकी झाली आहे. Bryxta या फुफ्फुस आणि गर्भाशयाचा कॅन्सरवरील इंजेक्शनची किंमत ₹ 25995 वरुन    ₹3318 वर आली आहे. हाडांशी संबंधित/कॅन्सर - इंजेक्शन असलेल्या DenOsteoRel ची किंमत ₹25955 वरुन ₹6240 वर आली आहे.

₹3502 कोटींची बचत

या निर्णयामुळे कॅन्सर उपचारांचा आर्थिक भार प्रचंड कमी होण्यास मदत होणार आहे. औषधांचे दर कमी झाल्यामुळे देशभरातील कॅन्सर रुग्णांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची वर्षाला अंदाजे ₹3502 कोटींची बचत होणार आहे. 

नव्या किंमती दाखवणं बंधनकारक

सर्व औषध विक्रेते, हॉस्पिटल्स आणि वैद्यकीय संस्थांना त्यांच्या आवारात तसेच वेबसाईट्सवर या औषधांची नवीन सुधारित किंमत यादी म्हणजेच नव्या एमआरपीचे दर ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या औषधांचे नवीन सुधारित दर केंद्र सरकारच्या 'फार्मा सही दाम' (Pharma Sahi Daam) या मोबाईल ॲपवर किंवा 'एनपीपीए'च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तपासता येतील.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES