मोठी बातमी! 80.15 कोटींच्या बँक घोटाळा! CBI कडून स्टार हाऊसिंग फायनान्सवर छापा
80.15 कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणी सीबीआयकडून स्टार हाऊसिंग फायनान्सवर छापा टाकण्यात आला आहे.
80.15 कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणी सीबीआयकडून स्टार हाऊसिंग फायनान्सवर छापा टाकण्यात आला आहे. उदयपूर आणि मुंबईतील सहा ठिकाणी सीबीआयकडून छापेमारी करण्यात आली आहे. कंपनीचे संचालक आणि संबंधित व्यक्तींच्या ठिकाणांची झडती यावेळी घेण्यात आली. बनावट कर्जांच्या माध्यमातून नॅशनल हाऊसिंग बँकेची 80.15 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
कर्जाच्या नावाखाली वितरित केलेली रक्कम अन्यत्र वळवल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, नॅशनल हाऊसिंग बँकेच्या तक्रारीवरून सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. छापेमारीत महत्त्वाची कागदपत्रे आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आलं आहे. आरोपींच्या यादीतआशिष जैन, कविश जैन, अनिल कृष्णन सचिदानंद आणि निर्मल कुमार जैन यांची नावे आहेत. फसवणूक, कटकारस्थान, विश्वासघात आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी केली जात आहे.
सीबीआयने बुधवारी उदयपूर आणि मुंबईतील सहा ठिकाणी शोधमोहीम राबवली असून, ही ठिकाणे 'स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड'च्या माजी संचालकांशी संबंधित आहेत. नॅशनल हाऊसिंग बँकेने दाखल केलेल्या एफआयआरच्या (FIR) आधारे ही कारवाई करण्यात आली असून, यात 80.15 कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणुकीचा आरोप आहे.
'स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड' आणि त्यांच्या संचालकांवर गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक करणे आणि बनावट कर्जाद्वारे निधी वळवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या कथित फसवणुकीमुळे नॅशनल हाऊसिंग बँकेचे 80.15 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
'स्टार हाऊसिंग फायनान्स'विरुद्ध सीबीआयची एफआयआर (FIR) नोंद
नॅशनल हाऊसिंग बँकेकडून प्राप्त झालेल्या लेखी तक्रारीच्या आधारे, सीबीआयने 'स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड', तिचे संचालक आणि काही अज्ञात सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवली आहे. सीबीआयच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, "तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, कर्ज घेणाऱ्या कंपनीने बनावट कर्जे (फँटम लोन) मंजूर करून निधीची अफरातफर केली, ज्यामुळे नॅशनल हाऊसिंग बँकेचे 80.15कोटी रुपयांचे नुकसान झाले. या छाप्यात तपासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे आक्षेपार्ह दस्तऐवज आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे."